धाराशिव : तालुक्यातील ढोकी येथे आज पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवी जिल्हा परिषद कन्या शाळा ढोकी येथे हॉल क्रमांक 4 मधील विद्यार्थ्यांना वेळ कमी दिल्याबद्दल परीक्षेमध्ये बसलेल्या विद्यार्थ्यांच्या पाल्यांकडून विद्यार्थ्यांना घेऊन जिल्हा परिषद कन्याशाच्या ग्राउंडवर भर दुपारी उन्हामध्ये ठिय्या आंदोलन करण्यात आले आहे.
व विविध मागण्यांचे जिल्हाधिकारी यांना निवेदन देखील देण्यात आले आहे. निवेदनात म्हटले आहे की जिल्हा परिषद कन्या शाळा ढोकी येथील हॉल क्रमांक चार मधील विद्यार्थ्यांना उशिरा पेपर मिळाला होता आणि पालकांनी विचारणा केल्यास वेळेवर पेपर दिला म्हणून सांगितले पेपर विद्यार्थ्यांनी उशिरा दिल्याचे सर्वांनी केंद्र संचालकाकडे मान्य केले आहे. त्यावर मोठ्या प्रमाणात अन्याय झाला आहे यावेळी काही शिक्षकांसोबत पालकांनी विद्यार्थ्यांना विचारणा केली असता वीस मिनिटे उशिरा दिल्याचे लक्षात आले आहे तरी विद्यार्थ्यांना न्याय मिळावा हीच नम्र विनंती निवेदनात नमूद केले आहे यावेळी हॉलवर पर्यवेक्षक नाव हारगुळे एसबी केंद्र संचालक नाव सरडे सर असे देखील निवेदनावर नमूद केले आहे या निवेद मध्ये तेरा विद्यार्थीची लिहून सोबत जोडण्यात आली आहेत व पालकांच्या स्वाक्षऱ्यांची एक प्रत देखील यासोबत जोडण्यात आली आहे.
अन्याय झालेल्या विद्यार्थ्यांना न्याय मिळणार का व पेपर उशिरा देणाऱ्या शिक्षकावर कारवाई होणार का? असा देखील सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. घडलेल्या घटनेवरून जिल्हा परिषद शिक्षण विभागाचा भोंगळ कारभार समोर आला आहे.