धाराशिव जिल्ह्यात सात ठिकाणी चोरी, गुन्हे नोंद

Spread the love

धाराशिव जिल्ह्यात सात ठिकाणी चोरी, गुन्हे नोंद

आनंदनगर पोलीस ठाणे : फिर्यादी नामे-पुजा कपील माने, वय 27 वर्षे, रा. विठ्इल रुक्मीणी मंदीर जवळ बॅक कॉलनी धाराशिव ता. धाराशिव या दि. 15.02.2024 रोजी 19.00 वा. सु. वरुडा रोडने पवार ट्युशन बॅक कॉलनी धाराशिव येथे जात होत्या दरम्यान एक अनोळखी इसमाने समोरुन मोटारसायकलवर येवून पुजा माने यांचे गळ्यातील 17 ग्रॅम वजनाचे  सोन्याचे मिनी गंठन अंदाजे 60,000₹ किंमतीचे जबरीने लुटून पसार झाला. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-पुजा माने यांनी दि.15.02.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन आनंदनगर पो. ठाणे येथे कलम  392 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

तुळजापूर पोलीस ठाणे : दि. 13.02.2024 रोजी 13.00 ते दि. 14.02.2024 रोजी 08.45 वा. सु.  हंगरगा तुळ पाटी येथील अंगणवाडी क्रं 12 चे खेलीचा कडी कोंडा अज्ञात व्यक्तीने उचकटून आत प्रवेश करुन 200 किलो हरबरा, 100 किलो मुगदाळ, तिन बॉक्स खाउ तेल 36 पिशव्या असा एकुण 28,600 ₹ किंमतीचा माल चोरुन नेला. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- रतन नानासाहेब साळुंके, वय 40 वर्षे, रा. हंगरगा तुळ पाटी ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी दि.15.02.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तुळजापूर पो. ठाणे येथे कलम 454, 457, 380 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

ढोकी पोलीस ठाणे : फिर्यादी नामे-महादेव रामलिंग कदम, वय 55वर्षे, रा. वाणेवाडी ता. जि. धाराशिव यांचे राहाते घराचे कुलूप अज्ञात व्यक्तीने दि.14.02.2024 रोजी 12.00 ते दि. 15.02.2024 रोजी 15.00 वा.पुर्वी तोडून आत प्रवेश करुन कपाटातील दोन ग्रॅमचे मंगळसुत्र, सांदीचे दोन लक्ष्मी फुलपात्र, चांदीचे दोन आरती व रोख रक्कम 65,000₹ असा एकुण  72,000₹ किंमतीचा माल चोरुन नेला. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- महादेव कदम यांनी दि.15.02.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन ढोकी पो. ठाणे येथे कलम 454, 457, 380 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

नळदुर्ग पोलीस ठाणे : फिर्यादी नामे-अजित एकनाथ लोमटे, वय 24 वर्षे, रा. सलगरा दि. ता. तुळजापूर जि. धाराशिव ह.मु.कुमठेगाव ता. जि. सोलापूर यांचे सलगरा येथील राहाते घराचे कुलूप अज्ञात व्यक्तीने दि. 14.02.2024 रोजी 23.00 ते दि.15.02.2024 रोजी 06.00 वा. सु. तोडून आत प्रवेश करुन घरातील कपाटातील 15 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, 32 इंची स्मार्ट एलईडी व रोख रक्कम 35,000 ₹ असा एकुण 92,500₹ किंमतीचा माल चोरुन नेला. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- अजित लोमटे यांनी दि.15.02.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन नळदुर्ग पो. ठाणे येथे कलम 457, 380 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

 

धाराशिव ग्रामीण पोलीस ठाणे : फिर्यादी नामे-प्रकाश भारत पाटील, वय 52 वर्षे, रा. पोहनेर ह.मु. लोहिया मंगल कार्यालयाजवळ तुळजापूर जि. धाराशिव यांचे पोहनेर शिवारातील शेत गट नं  363 मधील विहीरीवरील इलेक्ट्रीक वायर  400 फुट व  5 एचपीची मोटार अंदाजे 12,000 ₹ किंमतीची ही दि.11.02.2024 रोजी 06.00 वा. सु. ते दि. 12.02.2024 रोजी 08.30 वा. सु. अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- प्रकाश पाटील यांनी दि.15.02.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन धाराशिव ग्रामीण पो. ठाणे येथे कलम 379 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

धाराशिव शहर पोलीस ठाणे : फिर्यादी नामे- विनोद हरीश्चंद्र निंबाळकर वय 41 वर्षे रा. हिरो शोरुमच्या समोर भवानीनगर धाराशिव ता. जि. धाराशिव यांचा अंदाजे 17,000₹ किंमतीचा ओपो कंपनीचा मोबाईल फोन हा. दि. 21.01.2024  रोजी 13.00 ते 14.00 वा. सु. आठवडी बाजार धाराशिव येथुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेला. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- विनोद निंबाळकर यांनी दि.15.02.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन धाराशिव शहर  पो. ठाणे येथे कलम 379 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

तुळजापूर पोलीस ठाणे : फिर्यादी नामे-शंकर सदाशिव यमगर, वय 38 वर्षे, रा. यमगरवाडी ता. तुळजापूर जि. धाराशिव ह.मु. अजिंक्य रेसिडंन्सी नळदुर्ग रोड तुळजापूर ता. तुळजापूर जि. धाराशिव यांची अंदाजे 30,000₹ किंमतीची सी बी शाईन कंपनीची मोटरसायकल क्र एमएच 25 एएन 3563  हि दि. 12.02.2024 रोजी 00.00 ते दि. 13.02.2024 रोजी 06.00 वा. सु. शंकर यमगर यांचे राहाते घरासमोरुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- शंकर यमगर यांनी दि.15.02.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तुळजापूर पो. ठाणे येथे कलम 379 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

 

 


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!