मोदी गारंटी सर्वसामान्यांपर्यंत पोहोचने गरजेचे – आमदार राणाजगजितसिंह पाटील
धाराशिव : पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वात देश समृद्ध होत असून त्यांचे कार्य व शासनाच्या विविध योजनांची माहिती अर्थात ‘मोदी गॅरंटी’ जनतेपर्यंत पोहोचवून त्यांच्याशी संवाद साधण्याच्या अनुषंगाने भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून राबविल्या जात असलेल्या ‘गाव चलो अभियाना’ अंतर्गत काल दिनांक १० फेब्रुवारी रोजी आमदार राणाजगजितसिंह पाटील साहेब यांनी जळकोट ता. तुळजापूर येथील नागरिकांशी संवाद साधला. या अभियानांतर्गत त्यांनी आजी माजी शिक्षक, चर्मकार समाज व बॅडमिंटन ग्रुप च्या सदस्यांशी संवाद साधून त्यांच्या अडी अडचणी, मागण्या व संकल्पना जाणून घेतल्या.
भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून देशभर ‘ गाव चलो अभियान ‘ राबविले जात असून यास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. देशभरात निर्माण केलेले महामार्गाचे जाळे, संरक्षण क्षेत्रातील देशाची वाढलेली क्षमता, राम मंदिराची उभारणी, किसान सन्मान योजना, प्रत्येक घराला नळाद्वारे पाणी पुरवठ्याची जल जीवन योजना, कलम ३७० हटविणे यासारख्या मोदी सरकारने घेतलेल्या निर्णयांचे नागरिकांनी स्वागत करत त्यांचे आभार व्यक्त केले.
बॅडमिंटन ग्रुपच्या सदस्यांनी चर्चे दरम्यान गावातील विविध अडचणी मांडल्या. त्या सर्व अडचणी सोडविण्याचे मान्य करत ग्रुपच्या सदस्यांनी केलेल्या विनंती वरुन क्रीडा व युवक कल्याण विभागाच्या माध्यमातून इनडोर स्टेडीयम उभारण्यासाठी रु. १ कोटी निधी उपलब्ध करून देण्याचे मान्य केले व याबाबतचा प्रस्ताव पुढील आठवड्यात सादर करण्याच्या सूचना दिल्या. तसेच चर्मकार समाजाच्या मागणीप्रमाणे सभागृहसाठी रु. १० लक्ष निधी जाहीर केला.
आदरणीय नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वात देश वेगाने प्रगती साधत असून सर्वसामान्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी व जगभरात देशाला प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी त्यांनी केलेले कार्य विचारात घेवून देशाच्या सर्वांगीण विकासासाठी मोदी साहेबांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी सहकार्य करण्यासह शासनाच्या विविध योजनांचा लाभ गोर गरिबांना मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले.
यावेळी त्यांच्यासोबत धाराशिव लोकसभा समन्वयक नितीन काळे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य सतीश दंडनाईक, तालुकाध्यक्ष संतोष बोबडे, कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती सचिन पाटील, भाजपा जेष्ठ नेते प्रभाकर मुळे, जिल्हा सरचिटणीस अॅड दिपक आलुरे, माजी जि. प. सदस्य गणेश सोनटक्के, कृषि उत्पन्न बाजार समितीचे संचालक आशिष सोनटक्के, माजी प,स, सदस्य सिद्धू कोरे, सरपंच विवेकानंद मेलगिरी, भिवा इंगोले यांच्यासह विलास राठोड, नागनाथ किलजे, संजय अंगोले, संजय माने, हनुमंत अंगोले, तमानाप्पा माळी, बाळासाहेब पाटील, बाळासाहेब कदम, अरुण लोखंडे, सचिन कदम, ब्रह्मानंद कदम, अनिल राठोड, तानाजी राठोड, मोहन डांबरे, भीमराव राठोड, सुधाकर राठोड, सतीश माने, अरविंद लोखंडे, महादेव राठोड, अनिल बिडगे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.