आजही डॉ बाबासाहेब आंबेडकरांचीच पत्रकारिता देशाला दिशा देऊ शकते – शिंदे
मुक्ताई संस्थेच्यावतीने पत्रकारांचा सन्मान
धाराशिव दि.१० (प्रतिनिधी) – पूर्वी शोध पत्रकारितेच्या माध्यमातून अनेक बाबी पत्रकार लेखणीतून चव्हाट्यावर आणत होते. मात्र हल्ली शोध पत्रकारिता लुप्त होत चालली आहे. त्यामुळे भविष्यामध्ये सर्वच पत्रकारांनी समाजाच्या दृष्टीने दडवून ठेवलेल्या बाबी उघड्या करण्याची जबाबदारी घ्यावी. तसेच सध्या सर्व क्षेत्रांमध्ये अस्थिरता व भयता निर्माण करण्याचे षडयंत्र मोठ्या प्रमाणात सुरू आहे. हे रोखण्यासाठी आजही डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचीच पत्रकारिता देश व्यवस्थित चालण्यासाठी दिशा देऊ शकते, असे ठाम प्रतिपादन निवृत्त नायब तहसिलदार चंद्रकांत शिंदे यांनी दि.१० फेब्रुवारी रोजी केले.
धाराशिव शहरातील शासकीय विश्रामगृहात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी सूरु केलेल्या मूकनायक या वृत्तपत्रास १०४ वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे मुक्ताई बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्यावतीने पत्रकारांच्या सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते अध्यक्ष म्हणून बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून व्हॉईस ऑफ मीडियाचे जिल्हाध्यक्ष हुंकार बनसोडे, उद्योजक जयशिल भालेराव,संपादक पंढरीनाथ सरवदे,दैनिक सकाळचे शितल शिंदे,संपादक विजय अशोक बनसोडे,व्हॉईस ऑफ मीडियाचे महानगराध्यक्ष मल्लिकार्जुन सोनवणे,पंढरीनाथ सरवदे,बाबासाहेब देविदास बनसोडे,राजाराम बनसोडे,माजी नगरसेवक सिद्धार्थ बनसोडे,सचिन सरवदे,संस्थेचे अध्यक्ष सोमनाथ गायकवाड आदी उपस्थित होते.पुढे बोलताना शिंदे म्हणाले की,आज ही आपल्याकडे निर्भीड व तटस्थ एकही वृत्तपत्र नाही याची खंत असून पत्रकारांनी निर्भीड होणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले. तर आपल्या देशाची लोकशाही ही कायदे मंडळ, प्रशासन, विधिमंडळ व पत्रकारिता या चार खांबावर उभी आहे. यामध्ये लोकप्रतिनिधी सभागृहात वंचित घटकांचा आवाज उठवीत नाहीत. तर न्यायालय व प्रशासन देखील प्रचंड दबावाखाली काम करीत असल्याचा संशय निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले. मात्र चौथा खांब म्हणून पत्रकार आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून अतिशय मजबूत आहे. परंतू हल्ली पत्रकार देखील निर्भीडपणे बातम्या देताना दिसत नाहीत. जर लोकशाही वाचवायची असेल तर चारही खांब मजबूत ठेवावे लागतील असे त्यांनी सांगितले. विशेष म्हणजे समाजातील वंचित, पिचलेल्या व अन्यायग्रस्त घटनांचा आवाज जनतेसमोर आणण्यासाठी इलेक्ट्रॉनिक माध्यमे धजावत नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे प्रिंट व इलेक्ट्रिक माध्यमांच्या पत्रकारांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्याप्रमाणे प्रतिकूल परिस्थितीमध्ये मुक्या समाजाचा आवाज बनून त्यांच्यावरील होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडावी असे आवाहन त्यांनी केले. यावेळी जयशिल भालेराव,लेखक-विजय बनसोडे, पंढरीनाथ सरवदे, कुंदन कांबळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.यावेळी अर्जुन बनसोडे,कुंदन कांबळे,संतोष कांबळे, काकासाहेब कांबले ,पठाण सलीम,किशोर माळी, अशोक मनसुके,मुस्तफा पठाण,अमजद सय्यद,कलीम मुसा सय्यद, मल्लिकार्जुन सोनवणे,किरण कांबळे,जाफर भाई शेख,कुंदन शिंदे किशोर धुमाळ,दादासाहेब बनसोडे,राहुल कोरे,राहुल गाडे आप्पासाहेब शिरसाटे,श्रीकांत गायकवाड,आकाश नरोटे, किशोर माळी,अजित माळी या पत्रकारांना शाल,पुष्पगुच्छ व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. सूत्रसंचालन संदीप अंकुश यांनी व उपस्थितांचे आभार उमाजी गायकवाड यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी मुकेश मोठे बाबासाहेब कांबळे सुरेश कांबळे रवी कांबळे स्वराज जानराव शितल धावारे, समाधान सरवदे,यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमास पुष्पकात माळवे आनंद भालेराव ज्येष्ठ साहित्यिक विजयकुमार गायकवाड,धावारे राजेंद्र संग्राम बनसोडे, प्रवीण बनसोडे,बालाजी झेंडे,भाई फुलचंद गायकवाड, मुन्ना घरबुडवे, विद्यानंद बनसोडे, रणजीत गायकवाड,अंगुल माने, आशाताई कांबळे महादेव एडके, मेसा जानराव आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.