धाराशिव येथे रस्ता लुटीतील मालासह आरोपी ताब्यात

Spread the love

धाराशिव येथे रस्ता लुटीतील मालासह आरोपी ताब्या

धाराशिव स्थानिक गुन्हे शाखा : फिर्यादी नामे-शफीक युन्नुस शेख, वय 38 वर्षे, रा. खिरणीमळा धाराशिव ता. जि. धाराशिव हे दि. 03.02.2024 रोजी 05.30 ते 05.40 वा. सु. तुळजापूर नळदुर्ग बायपास उड्डानपुलाचे सर्व्हीस रोडचे कच्या रस्त्यावर हंगरगा शिवार येथुन फोर्ड फेस्टा कार क्र16 एटी 2393 ने धाराशिव येथुन हैद्राबाद येथे अंत्यविधीसाठी जात होते. दरम्यान अज्ञात 4 इसमांनी फिर्यादीची कार आडवून कोयत्याचा धाक दाखवून सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकुण 77,000₹ माल जबरीने लुटून पसार झाले होते. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- शफीक शेख यांनी दि.03.02.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तुळजापूर पो. ठाणे येथे गुन्हा क्र. 40/2024  हा कलम 392, 34  भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

            गुन्हा तपासादरम्यान मा. पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक श्री. गौहर हसन. यांचे मार्गदर्शनाखाली सथानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. वासुदेव मोरे यांचे आदेशावरुन स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुन्ह्याच्या कार्यपध्दीच्या व मिळालेल्या तांत्रिक विश्लेशन व गोपनीय माहितीच्या आधारे मोहा, ता. कळंब येथील- गुड्या उर्फ प्रकाश शहाजी काळे, वय 21 वर्षे रा. मोहा, ता. कळंब जि. धाराशिव यास गुन्हा घडल्यापासून अवघ्या काही दिवसात दि. 08.02.2024 रोजी 07.30 वा. सु. मोहा येथुन ताब्यात घेतले. त्याच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारपुस केली असता त्याने प्रथमत: पोलीसंना उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यास अधिक विश्वासात घेउन विचारपुस केली असता त्याने सदर गुन्हा त्याच्या अन्य तीन साथीदारांच्या मदतीने केल्याची कबुली दिली. पोलीसांनी त्याच्या ताब्यातून गुन्ह्यातील गेल्या माला पैकी 30,000₹ रोख रक्कम व एक काळ्या रंगाची बायोमॅट्रीक मशीन असा एकुण 32,000₹ किंमतीचा माल हस्तगत केला. काळ्या रंगाची बायोमॅट्रीक मशीन या बाबत माहिती घेतली असता सदर बाबत पोलीस ठाणे येरमाळा येथे गुरन 49/2023 कलम 392, 34 भ.द.वि.सं. प्रमाणे गुन्हा नोंद असल्याबाबत खात्री झाली. आरोपी यास चोरीच्या मालासह तुळजापूर पोलीसांच्या ताब्यात दिले असून त्याच्या अन्य तीन साथीदारांचा पोलीस शोध घेत आहेत.

            सदरची कामगीरी मा. पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी व मा. श्री. गौहर हसन. यांचे मार्गदर्शनाखाली  सथानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. वासुदेव मोरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. सुदर्शन कासार, पोउपनि- श्री. संदीप ओहोळ, सपोफौ/ वलीउल्ला काझी, पोलीस हावलदार- विनोद जानराव, जावेद काझी, अमोल निंबाळकर, समाधान वाघमारे, शैकत पठाण, फरहाण पठाण, नितीन जाधवर, अशोक कदम, सुनिल मोरे, महेबुब अरब, रत्नदिप डोंगरे,  मपोहा/ शैला टेळे, रंजना होळकर यांच्या पथकाने केली आहे


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!