जिल्हाधिकारी कार्यालयात धाराशिव शहरातील समस्या बाबत शहरवासीय व नगरपरिषद अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये बैठक संपन्न
एक फेब्रुवारीपासून शहरातील सर्व समस्या सुरळीत होतील -न.प अधिकारी यांचे आश्वन
शहरातील पाणीपट्टी कर दोन कोटी – पाण्याचा खर्च वीस कोटी
धाराशिव : जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये दि.२३ जानेवारी 2024 रोजी जिल्हाधिकारी सचिन ओम्बासे यांच्या अध्यक्षतेखाली नगरपरिषद अधिकाऱी व शहरातील नागरिक यांच्या उपस्थितीत धाराशिव शहरातील स्वच्छतेबाबत बैठक संपन्न झाली आहे. नगरपालिकेमध्ये पैसे भरण्याची ई प्रणाली बंद पडल्याने देखील कर भरण्यास नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याची तक्रार देखील यावेळी नागरिकांनी केली आहे.
शहरातील अस्वच्छता व पाणी, सिग्नल, अतिक्रमण, याबाबत शहरातील नागरिकांनी समस्या मांडल्या व स्वच्छता करणारा ठेकेदाराला सतरा सतरा महिने जर पैसे बील दिले नाही तर काम कसे करणार असा देखील सवाल नागरिकांनी उपस्थित केला तर काही राजकीय पुढाऱ्याच्या दबावावरून शहरात स्वच्छता करणाऱ्या ठिकेदाराचे बिल काढण्यात येत नसेल तर अवघड आहे. ठेकेदार काम करत नसेल तर त्यावर कारवाई करा मात्र चालू कामांमध्ये खोडंबा का असा देखील सवाल शहरातील नागरिक बाळासाहेब सुभेदार यांनी उपस्थित केला. शहरातील वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक घरी झोपा काढतात. शहरातील वाहतूक विस्कळीत झाली आहे. असे देखील मत सुभेदार यांनी मांडले.
चार महिन्या अगोदर काही प्रभागांमध्ये नगरपालिकेकडून नागरिक समस्या नोंदवून घेतल्या होत्या मात्र त्या सोडवण्यात देखील नगरपालिका अयशस्वी ठरली आहे अशी प्रतिक्रिया जिल्हाधिकाऱ्यांसमोर रणवीर इंगळे यांनी मांडली आहे. शहरात सर्वात मोठ्या प्रमाणात अस्वच्छता निर्माण झाली आहे तर तात्काळ प्रशासनाने उपाययोजना राबवाव्यात अशी देखील मागणी रणवीर यांनी केली.
शहरातील बंद पथदिवाबाबत देखील नागरिकांनी सवाल उपस्थित केला यावेळी महाराष्ट्र शासन यांच्याकडून टेंडर देण्यात आलेल्या कंपनीला माहिती कळवलेली आहे व लवकरच कंपनी एक तारखेपासून काम सुरू करेल अशी माहिती नगरपरिषद उपमुख्य अधिकारी यांनी दिली आहे.
शहरातील खाजा नगर , इंगळे गल्ली या परिसरामध्ये कुचर कुंडी मधील जाळलेल्या कचऱ्यापासून निघणारा धुराचा त्रास मोठ्या प्रमाणात होत आहे कचरकुंडीमध्ये जाळण्यात येणाऱ्या कचऱ्याचे धुर संध्याकाळी मोठ्या प्रमाणात पसरत आहे यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होत आहे अशी देखील समस्या नागरिकांच्या वतीने मांडण्यात आली होती याबाबत देखील उपाययोजना करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी सचिन ओंम्बासे यांनी दिल्या आहेत. नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी माहिती दिल्याप्रमाणे एक फेब्रुवारीपासून शहरात स्वच्छता करण्यासाठी दिलेला ठेकेदार काम सुरू करेल व त्यांचे परिक्षण करण्यासाठी पंधरा दिवसानंतर 15 फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी यांनी बैठक बोलावली आहे.
धाराशिव शहरातील पाणीपट्टी कर फक्त दोन कोटी जमा होत आहे तर पाण्यासाठी लागणारा खर्च वीस कोटी रुपये आहे यामुळे मोठी अडचण निर्माण झा
ल्याची माहिती जिल्हाधिकारी यांनी दिली आहे. आतील पुन्हा नागरिकांच्या समस्या नोंदवून घ्या व आपल्या स्तरावर सोडवण्याचा प्रयत्न करा, शहरात पाणी पुरवठाचे व्यवस्थापन योग्य करा , वाहतूक शाखेची संपर्क करून शहरातील वाहतूक सुरळीत करा अशा सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या आहेत.