उस्मानाबाद नांमतरणाचा वाद , कोर्टाने दिली पुढची तारीख

Spread the love

धाराशिव : – ( Osmanabad to Dharashiv ) उस्मानाबाद नांमतरणाचा वादाचे प्रकरण मुंबई हायकोर्ट मध्ये सुरू आहे‌. याबाबत याचिकाकर्ते मसुद शेख यांनी दिलेल्या माहितीनुसार पुढील सुनावणी 25 जानेवारीला होणार आहे.

औरंगाबाद शहराचे नाव संभाजीनगर आणि उस्मानाबाद शहराचे ( Osmanabad to Dharashiv )
नाव धाराशिव करण्याबाबतच्या प्रस्तावास 29 जुन 2022 रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.

उस्मानाबाद हे नाव हैदराबाद संस्थानचा सातवा निजाम मीर उस्मान अली खान असफ जाह याने सत्ताग्रहण केल्यावर त्याच्या नावावरून ठेवण्यात आले. त्यानंतर 2022 मध्ये महाराष्ट्र शासनाने उस्मानाबादचे नामांतर “धाराशिव” ( Osmanabad to Dharashiv ) असे पूर्ववत केले.

25 मे 1995 रोजी उस्मानाबादच्या नामांतराची ( Osmanabad to Dharashiv ) प्रथम घोषणा तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी केली होती. त्यानंतर युतीच्या काळात औरंगाबादमध्ये झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तबही करण्यात आले होते. त्यानंतर दोन जणांनी या निर्णायाविरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करून नामांतर ठरावास स्थगिती मिळविली होती. 2020 मध्ये पुन्हा नामांतर ठराव मंजूर करण्यात आला व हा वाद पुन्हा कोर्टात सुरू आहे.

मीर उस्मान अली यांच्या बद्दल माहिती..

मीर उस्मान अली खान सिद्दिकी, असफ जाह सातवा ‘(जन्म : 6 एप्रिल 1886 ; मृत्यू: 27 फेब्रुवारी 1967 ) हा हैदराबाद आणि बरारचा शेवटचा निजाम होता. सन 1911 आणि 1948 च्या दरम्यान त्याने हैदराबाद संस्थानावर राज्य केले 26 जानेवारी 1950 रोजी हैदराबाद हे भारतातील नवे राज्य बनले. 

इंडो-चिनी मतभेदांमुळे होणाऱ्या संभाव्य युद्धासाठी , निजामाला राष्ट्रीय संरक्षण निधीला योगदान देण्याची विनंती झाली. मीर उस्मान अली खानने त्यासाठी 5000 किलो सोने दिले. भारतातील कोणत्याही व्यक्तीने किंवा संस्थेने केलेला हे सर्वात मोठे योगदान आहे.

निजामाच्या हैदराबाद संस्थानातील शिक्षणाचे बजेट एकूण उत्पन्नाच्या सुमारे 11% होते. हे भारतातील कुठल्याही राज्याच्या किंवा केंद्र सरकारच्या बजेटपेक्षा कितीतरी जास्त आहे. निजामाने मराठवाडा क्षेत्रात कृषी संशोधनाचा पाया घातला. 18 मे 1972 रोजी ही योजनेचे रूपांतर मराठवाडा कृषी विद्यापीठात झाले. निजामाने दिलेल्या 54 एकर जमिनीवर मराठवाडा विद्यापीठ बनले.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!