शम्शोद्दीन गाजी रहमतुल्लाह यांचा ऊरूस उत्साहात व शांततेत साजरा करा , अधिकाऱ्यांनी आपापली जबाबदारी ओळखून प्रामाणिकपणे काम करा – अप्पर जिल्हाधिकारी शिवाजी शिंदे
धाराशिव,दि.19 ( जिमाका)हजरत ख्वाजा शमसुद्दीन गाजी रहमतुल्लाह यांचा उरूस दरवर्षीप्रमाणे यावर्षीही मोठ्या उत्साहात शांतता व सद्भावना कायम राखत साजरा करण्याचे आवाहन अपर जिल्हाधिकारी शिवाजी शिंदे यांनी आज दिनांक 19 जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक सभागृहात आयोजित उर्स कमिटी सोबत बैठकीत केले. यावेळी अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक गौहर हसन, निवासी उपजिल्हाधिकारी महेंद्रकुमार कांबळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. इस्माईल मुल्ला, तहसीलदार डॉ.शिवानंद बिडवे,मुख्याधिकारी वसुधा फड, जिल्हा वक्फ अधिकारी अब्दुल अतीक खान, सज्जादा नशिन समियोद्दिन मशायख, ॲड.काझी परवेझ अहमद, सय्यद रफीक हुसैनी यांच्यासह उरूस कमिटीचे सदस्य संबंधित विभागांचे अधिकारी
. उपस्थित होते.
24 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या उरूसमध्ये संध्याकाळी 7 ते रात्री 9 पर्यंत पंखा मिरवणूक, गुरुवार 25 जानेवारी रोजी सेहरा मिरवणूक, 26 जानेवारी रोजी गुसल मिरवणूक , शनिवार 27 जानेवारी रोजी मुख्य संदल मिरवणूकीचे आयोजन करण्यात येईल. तसेच 28 जानेवारी रविवारी रात्री 9 ते पहाटे 5 वाजेपर्यंत चिरागा व कव्वाली कार्यक्रम आयोजित केल्या जाणार. 29 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजता दर्ग्यामध्ये जियाrत आणि रात्री 9 ते पहाटे 5 वाजेपर्यंत कव्वाली कार्यक्रम आयोजित केल्या जाणार मंगळवार 30 जानेवारी रोजी वाज बयान व नाते शरीफ कार्यक्रम,31 तारखेला मुशायरा, 1 फेब्रुवारी रोजी गझल कार्यक्रम तसेच शुक्रवार दोन फेब्रुवारी रोजी कुस्ती स्पर्धा व आतिषबाजीचे कार्यक्रम आयोजित केले जाणार असल्याची माहिती दर्ग्याचे सज्जादा नशीन यांनी यावेळी दिली.
या बैठकीत प्रामुख्याने नगरपरिषदेने उरूस कालावधीत दर्गा व परिसराच्या ठिकाणी स्वच्छता ठेवावी. रस्ते आणि नाल्यांची साफसफाई पिण्याच्या स्वच्छ पाण्याची व्यवस्था करणे , स्ट्रीट लाईटची व्यवस्था करणे अग्निशमन दलाचे पथक ठेवन्याबाबत सूचना करण्यात आल्या. गेल्या वर्षी उरूसात चिराग मिरवणुकीच्या वेळी एक सांड मुख्य कार्यक्रमात घुसला होता आणि याघटनेने मोठी खडबड उडाली होती तसेच काही भाविक किरकोळ जखमी ही झाले होते. त्यामुळे मोकाट फिरणाऱ्या जनावरांच्या बंदोबस्त करण्याबाबतही अधिकारी वसुधा फड यांना सूचना करण्यात आल्या.
या कालावधी मुख्य संदल मिरवणूक, कव्वाली, मुशायरा,कुस्ती स्पर्धा आणि इतर धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केल्या जातात. या कार्यक्रमांमध्ये नागरिक व श्रद्धालु मोठ्या प्रमाणात गर्दी करतात अशा वेळेस प्रत्येक कार्यक्रमास आवश्यक पोलीस बंदोबस्त द्यावा या मागणीला अतिरिक्त पोलीस अधीक्षक गौहर हसन यांनी मान्य केले तसेच मिरवणूक मध्ये मोठ्या प्रमाणात बंदोबस्त ठेवण्याचे व कव्वाली मैदानावर आणि दर्गामध्ये महिला पोलिसांची ही नियुक्ती करण्यात येईल अशी ग्वाही दिली.
उरूस कालावधीत भाविकांची संख्या तसेच थंडीचे दिवस असल्यामुळे रोगराई पसरू नये या अनुषंगाने वैद्यकीय पथकाची नियुक्ती करण्यात येईल तसेच ॲम्बुलन्स आणि अत्यावश्यक सोयीनियुक्त फिरते दवाखाने या ठिकाणी नियुक्त केले जातील. या कालावधी त पाणीपुरवठा लाईट व्यवस्था आणि अन्न व औषध प्रशासनाकडून खाद्यपदार्थांवर निरीक्षण ठेवण्यात येणार असल्याचे आर डी सी श्री.कांबळे यावेळी म्हणाले. हजरत शमसुद्दिन गाजी यांच्या उरुसासाठी जिल्ह्यातील ग्रामीण भागात व तालुक्यातून तसेच राज्यभरातून लोक येतात. या अनुषंगाने शहरात या कालावधीत रेल्वे स्थानक ते बस स्थानक ते दर्गा मैदान पर्यंत बसेस ची सेवा उपलब्ध करून दिली जाईल.तसेच उरूस मैदानातून पुढील गावी जाणाऱ्या बसेस वैराग व माढा या गाड्यांचे मार्गात बदल करण्यात येतील.
यावेळी अपर जिल्हाधिकारी शिवाजी शिंदे यांनी उपस्थित शमसुद्दीन गाजी रहमतुल्लाह यांचा उरूस
हजरत ख्वाजा शमसुद्दीन गाजी रहमतुल्लाह यांचा उरूस दरवर्षीप्रमाणे यावर्षीही मोठ्या उत्साहात शांतता व सद्भावना कायम राखत साजरा करण्याचे आवाहन अपर जिल्हाधिकारी शिवाजी शिंदे यांनी आज दिनांक 19 जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक सभागृहात आयोजित उर्स कमिटी सोबत बैठकीत केले. यावेळी अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक गौहर हसन, निवासी उपजिल्हाधिकारी महेंद्रकुमार कांबळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. इस्माईल मुल्ला, तहसीलदार डॉ.शिवानंद बिडवे,मुख्याधिकारी वसुधा फड, जिल्हा वक्फ अधिकारी अब्दुल अतीक खान, सज्जादा नशिन समियोद्दिन मशायख, ॲड.काझी परवेझ अहमद, सय्यद रफीक हुसैनी यांच्यासह उरूस कमिटीचे सदस्य संबंधित विभागांचे अधिकारी
. उपस्थित होते.
24 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या उरूसमध्ये संध्याकाळी 7 ते रात्री 9 पर्यंत पंखा मिरवणूक, गुरुवार 25 जानेवारी रोजी सेहरा मिरवणूक, 26 जानेवारी रोजी गुसल मिरवणूक , शनिवार 27 जानेवारी रोजी मुख्य संदल मिरवणूकीचे आयोजन करण्यात येईल. तसेच 28 जानेवारी रविवारी रात्री 9 ते पहाटे 5 वाजेपर्यंत चिरागा व कव्वाली कार्यक्रम आयोजित केल्या जाणार. 29 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजता दर्ग्यामध्ये जियाrत आणि रात्री 9 ते पहाटे 5 वाजेपर्यंत कव्वाली कार्यक्रम आयोजित केल्या जाणार मंगळवार 30 जानेवारी रोजी वाज बयान व नाते शरीफ कार्यक्रम,31 तारखेला मुशायरा, 1 फेब्रुवारी रोजी गझल कार्यक्रम तसेच शुक्रवार दोन फेब्रुवारी रोजी कुस्ती स्पर्धा व आतिषबाजीचे कार्यक्रम आयोजित केले जाणार असल्याची माहिती दर्ग्याचे सज्जादा नशीन यांनी यावेळी दिली.
या बैठकीत प्रामुख्याने नगरपरिषदेने उरूस कालावधीत दर्गा व परिसराच्या ठिकाणी स्वच्छता ठेवावी. रस्ते आणि नाल्यांची साफसफाई पिण्याच्या स्वच्छ पाण्याची व्यवस्था करणे , स्ट्रीट लाईटची व्यवस्था करणे अग्निशमन दलाचे पथक ठेवन्याबाबत सूचना करण्यात आल्या. गेल्या वर्षी उरूसात चिराग मिरवणुकीच्या वेळी एक सांड मुख्य कार्यक्रमात घुसला होता आणि याघटनेने मोठी खडबड उडाली होती तसेच काही भाविक किरकोळ जखमी ही झाले होते. त्यामुळे मोकाट फिरणाऱ्या जनावरांच्या बंदोबस्त करण्याबाबतही अधिकारी वसुधा फड यांना सूचना करण्यात आल्या.
या कालावधी मुख्य संदल मिरवणूक, कव्वाली, मुशायरा,कुस्ती स्पर्धा आणि इतर धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केल्या जातात. या कार्यक्रमांमध्ये नागरिक व श्रद्धालु मोठ्या प्रमाणात गर्दी करतात अशा वेळेस प्रत्येक कार्यक्रमास आवश्यक पोलीस बंदोबस्त द्यावा या मागणीला अतिरिक्त पोलीस अधीक्षक गौहर हसन यांनी मान्य केले तसेच मिरवणूक मध्ये मोठ्या प्रमाणात बंदोबस्त ठेवण्याचे व कव्वाली मैदानावर आणि दर्गामध्ये महिला पोलिसांची ही नियुक्ती करण्यात येईल अशी ग्वाही दिली.
उरूस कालावधीत भाविकांची संख्या तसेच थंडीचे दिवस असल्यामुळे रोगराई पसरू नये या अनुषंगाने वैद्यकीय पथकाची नियुक्ती करण्यात येईल तसेच ॲम्बुलन्स आणि अत्यावश्यक सोयीनियुक्त फिरते दवाखाने या ठिकाणी नियुक्त केले जातील. या कालावधी त पाणीपुरवठा लाईट व्यवस्था आणि अन्न व औषध प्रशासनाकडून खाद्यपदार्थांवर निरीक्षण ठेवण्यात येणार असल्याचे आर डी सी श्री.कांबळे यावेळी म्हणाले. हजरत शमसुद्दिन गाजी यांच्या उरुसासाठी जिल्ह्यातील ग्रामीण भागात व तालुक्यातून तसेच राज्यभरातून लोक येतात. या अनुषंगाने शहरात या कालावधीत रेल्वे स्थानक ते बस स्थानक ते दर्गा मैदान पर्यंत बसेस ची सेवा उपलब्ध करून दिली जाईल.तसेच उरूस मैदानातून पुढील गावी जाणाऱ्या बसेस वैराग व माढा या गाड्यांचे मार्गात बदल करण्यात येतील.
यावेळी अपर जिल्हाधिकारी शिवाजी शिंदे यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना आपापली जबाबदारी ओळखून प्रामाणिकपणे काम करण्याच्या सूचना केल्या.