धाराशिव दि.19 ( antarsawadnews ):- महाराष्ट्र शासनामार्फत स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त सरळसेवेच्या कोटयातील 75 हजार पदांची सरळसेवा मेगाभरती अंतर्गत कडील गट-क मधील विविध विभागाकडील एकूण 21 संवर्गातील (वाहन चालक व गट ड संवर्गातील पदे वगळून) 453 पदे सरळसेवेने भरण्यासाठीची जाहीरात दिनांक 05 ऑगस्ट 2023 रोजी प्रसिध्द करण्यात येवून दि. 5 ऑगस्ट 2023 ते दि. 25 ऑगस्ट 2023 या कालावधीत ऑनलाईन पध्दतीने अर्ज स्विकारण्यात आले होते.
पदभरतीसाठीची परिक्षा ही IBPS (इंस्टीटयुट ऑफ बँकिग पर्सोनेल सिलेक्शन), कांदिवली (पुर्व) मुंबई-4000101 या कंपनीमार्फत ऑनलाईन पध्दतीने घेण्यात आली जिल्हा परिषद कडील वरीष्ठ सहाय्यक (लेखा) तसेच रिंगमन (दोरखंडवाला) या परिक्षेचा निकाल IBPS कंपनीमार्फत जाहिर केलेला असून हा निकालाची IBPS कंपनीचा Water Mark असलेली Qualified उमेदवारांची Combined गुणानुक्रमे प्राप्त यादी जिल्हा परिषद धाराशिव कडील https://www.zposmanabad.gov.in तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाकडील https://osmanabad.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेली आहे.
जिल्हा परिषद धाराशिव सरळसेवा पदभरती – 2023 अंतर्गत वरीष्ठ सहाय्यक (लेखा) व रिंगमन (दोरखंडवाला) या संवर्गातील पदभरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांनी त्यांना ऑलनाईन लेखी परिक्षेमधील प्राप्त गुण हे उपरोक्त संकेतस्थळास भेट देवून पहावयाचे आहेत.
तसेच निकालाचे अनुषंगाने भरती प्रक्रियेबाबतच्या पुढील सुचना जिल्हा परिषदेकडील https://www.zposmanabad.gov.in या संकेतस्थळावर वेळोवेळी प्रसिध्द करण्यात येतील, असे आवाहन जिल्हा परिषद प्रशासनाचे वतीने करण्यात येत आहे.