धाराशिव ( उस्मानाबाद) : हजरत ख्वाजा शमशोदीन गाजी रहे दर्गा पाठीमागील कब्रस्तान ( दफनभूमी ) असलेल्या ठिकाणी शहरातील नागरिकांच्या वतीने स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे या मोहिमेमध्ये जास्तीत जास्त लोकांनी सहभाग नोंदवून स्वच्छता करण्यासाठी मदत करावी असे आवाहन नागरिकांनी उभा केलेला स्वच्छता मोहीम संघाकडून करण्यात आली आहे. दफनभूमी च्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात काटेरी झाडेझुडपे आली आहेत. त्यामुळे दफन करताना मोठ्या अडचणीचा सामना नागरिकांना करावा लागत आहे.
ही गोष्ट लक्षात घेऊन नागरिकांनीच स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे व या ठिकाणी उद्या रविवार दिनांक 14 जानेवारी रोजी सकाळी नऊ वाजल्यापासून सुचिता मोहीम करण्यात येणार आहे यामध्ये जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन स्वच्छता मोहीम संघाकडून करण्यात आले आहे.