धाराशिव,दि.१५ ऑक्टोबर (प्रतिनिधी) सन २०२५-२०२६ या आर्थिक वर्षात रब्बी हंगामासाठी जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) योजनेअंतर्गत दुभत्या जनावरांना खाद्य उपलब्धतेसाठी सुधारणा कार्यक्रमांतर्गत जनावरांचा चारा उत्पादन करण्यासाठी या योजनेतून शेतकऱ्यांना सुधारित जातीचे (F-Maize-ADV-756) संकरीत मका बियाणे १०० टक्के अनुदानावर देण्यात येणार आहे.
जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) योजनेअंतर्गत दुभत्या जनावरांना खाद्य उपलब्धतेसाठी सुधारणा कार्यक्रमांतर्गत जनावरांचा चारा उत्पादन करण्यासाठी पशुसंवर्धन विभागामार्फत जिल्ह्यातील लाभार्थ्यांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज घेऊन निवड प्रक्रिया करण्यात येणार असल्याचे कळविण्यात आले आहे.
या योजनेतून जिल्ह्यातील पशुपालकांनी १५ ऑक्टोबर २०२५ ते २५ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत चारा बियाण्यासाठी अर्ज करावेत.यासाठीचा Google Form लिंक जिल्हा परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर अपलोड करण्यात आलेली आहे.जास्तीत जास्त संख्येने जिल्ह्यातील सर्व प्रवर्गातील पशुपालकांनी या योजनेचा लाभ घ्यावा,असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा उपआयुक्त,पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय, विभाग धाराशिव यांनी आवाहन केले आहे.