अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर गौर (वा.) येथे मोफत पशुधन आरोग्य शिबिर संपन्न

Spread the love


धाराशिव :
श्री सिद्धीविनायक परिवार धाराशिव, राष्ट्रीय डेअरी विकास बोर्ड (NDDB), राष्ट्रीय गोपालक जागृती अभियान व MSD पशु आरोग्य यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन

धाराशिव- गेल्या काही दिवसांत झालेल्या अतिवृष्टीमुळे पशुधनाचे मोठे नुकसान होऊ नये, यासाठी गौर (वा.) ता. कळंब येथे मोफत पशुधन आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात शंभरहून  अधिक पशुधनांसाठी जंतनाशक व इतर आवश्यक औषधांचे वाटप तसेच तज्ज्ञांकडून प्रत्यक्ष तपासणी करण्यात आली.

शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी प्रक्षेत्र व्यवस्थापक श्री. कुणाल घुंगार्डे यांचे विशेष सहकार्य लाभले.

भारतीय जनता पक्षाचे धाराशिव जिल्हाध्यक्ष तथा श्री सिद्धीविनायक परिवाराचे संस्थापक अधिवक्ता दत्ता कुलकर्णी यांच्या सुचनेनुसार हे शिबिर आयोजित करण्यात आले. त्यांनी सांगितले की, “शेतकऱ्यांचे पोट भरणारे व खरी ताकद म्हणजे गाई-गोमाते; त्यांची काळजी घेणे ही आपली सामाजिक व राजकीय जबाबदारी आहे.” अतिवृष्टीमुळे प्रभावित भागांमध्ये अशा शिबिरांची मालिका हाती घेण्यात येणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

या शिबिराला गजानन पाटील, हनुमंत माने, प्रविण बाराते, बलराम कुलकर्णी, दत्तात्रय शेळके, राजेंद्र कापसे यांच्यासह गावातील मान्यवर, शेतकरी, दुध उत्पादक, पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती लाभली.

या सामाजिक उपक्रमामुळे पशुपालकांना मोठा दिलासा मिळाला असून, गावोगावी असे प्रयत्न राबविण्याचा संकल्प आयोजकांनी व्यक्त केला.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!