राज्यातील पुरग्रस्त भागातील उच्च व वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क माफ करावी –आमदार कैलास पाटील

Spread the love


धाराशिव ता. 30: राज्यामध्ये ऑगस्ट आणि सप्टेंबर मधील अतिवृष्टीमुळे जवळपास 31 जिल्ह्यांमध्ये शेती आणि इतर मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या अतिवृष्टीचा फटका मराठवाडा, विदर्भ आणि सोलापूर, अहिल्यानगर भागांना बसला आहे.त्यामुळं विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्क भरणे अडचण होत आहे. त्यामुळं हे शुल्क माफ करण्याची मागणी आमदार कैलास पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कडे केली.
धाराशिव, बीड, लातूर, आणि परभणी या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या भागातील नागरीकांचे उपजिवेकेचे साधन शेती असल्यामुळे अतिवृष्टीमुळे शेतकरी वर्ग आर्थिक संकटात सापडला आहे. त्यांचे उत्पनाचे साधन अतिवृष्टी व पुरामुळे निसर्गाने हिरावून घेतले असल्याने त्यांना जगणेही असाह्य झाले आहे. त्यात पुरग्रस्त भागामधील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक साहित्याचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना व शेतमजुरांना आपल्या पाल्याची शैक्षणिक शुल्क भरणे अशक्य झाले असून बऱ्याच महाविद्यालयाने विद्यार्थ्यांना शुल्क भरणेसाठी वारंवार मागणी करत असल्याने बरेच विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे अतिवृष्टी तसेच पुरग्रस्त भागातील शासकीय व खाजगी महाविद्यालयामध्ये उच्च व वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याचे शैक्षणिक शुल्क माफ करुन विद्यार्थी व पालकांना दिलासा देऊन शैक्षणिक शुल्क माफ करण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राव्दारे आमदार कैलास पाटील यांनी केली आहे.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!