धाराशिव (प्रतिनिधी):
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. मैनाक घोष यांनी आपल्या कर्तव्यनिष्ठेचा आदर्श दाखवून दिला आहे. वैयक्तिक दुःखाच्या प्रसंगातही त्यांनी जनतेच्या सुरक्षेला प्राधान्य देत जबाबदारी पार पाडली.
श्री. घोष यांच्या वडिलांचे निधन झाल्याच्या वेदनादायी परिस्थितीत, वडगाव सिद्धेश्वर येथील पाझर तलाव क्र. ०२ धोकादायक पातळीवर पोहोचल्याची माहिती मिळाली. युवानेते अंकुश काका मोरे आणि माजी सदस्य गजेंद्र जाधव यांच्या माध्यमातून बातमी कळताच, त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
संबंधित जलसंधारण विभागासह अधिकाऱ्यांना बोलावून, सांडव्याची खोली वाढवण्याचे व पाण्याचा सुरक्षित विसर्ग करण्याचे आदेश दिले. या समयोचित निर्णयामुळे गावकऱ्यांचा जीवित व मालमत्तेवरील मोठा धोका टळला.
श्री. घोष यांचे हे कार्य प्रशंसनीय असून, वैयक्तिक दुःखावर मात करून जनतेच्या सुरक्षेसाठी झटणारे अधिकारी समाजासाठी प्रेरणादायी ठरले आहेत.
जनतेतूनही “असेच अधिकारी असावेत!” अशा प्रतिक्रिया उमटत आहेत.
श्री. मैनाक घोष यांच्या वडिलांना भावपूर्ण श्रद्धांजली!
लोककल्याणाच्या या समर्पित भावनेला समाजाचा सलाम!
धाराशिव जिल्हा परिषदेचे सीईओ मैनाक घोष यांनी वडिलांच्या निधनाच्या दुःखद प्रसंगातही कर्तव्याला प्राधान्य देत गावकऱ्यांचा जीवित व मालमत्ता वाचवली.
धाराशिव बातम्या, मैनाक घोष, जिल्हा परिषद अधिकारी, वडगाव सिद्धेश्वर तलाव, अतिवृष्टी, पूरस्थिती, कर्तव्यनिष्ठ अधिकारी
#धाराशिव #उस्मानाबाद #धाराशिवन्यूज #उस्मानाबादन्यूज #अंतरसंवादन्यूज #Dharashiv #Osmanabad #DharashivNews #OsmanabadNews #AntarsanwadNews #Flood #Duty #CEO #Inspiration