धाराशिव :
महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री व तुळजापूरचे माजी आमदार मधुकरराव चव्हाण यांच्या मागणीला अखेर यश मिळाले आहे. तुळजाभवानी मंदिर संस्थानने मुख्यमंत्री सहायता निधीसाठी तब्बल १ कोटी रुपयांचा निधी देण्याचा निर्णय घेतला आहे.
काही दिवसांपूर्वी माजी आमदार चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेऊन जिल्ह्यातील पूरग्रस्त भागांना मदत करण्यासाठी मंदिर संस्थानकडून निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. या मागणीवर जिल्हा प्रशासनाने सकारात्मक पावले उचलत आज दिनांक २७ सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी तुळजाभवानी मंदिर संस्थानकडून मदतीचा निधी वर्ग केल्याची माहिती मिळाली आहे.
पूरग्रस्त भागातील जनतेला मदत मिळावी यासाठी सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे माजी आमदार मधुकरराव चव्हाण यांच्या प्रयत्नांना यश आल्याचे स्पष्ट होत आहे.