धाराशिव : कळंब तालुक्यातील आवाड शिरपूरा परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या बाधित क्षेत्राची पाहणी आमदार कैलास पाटील यांनी आज शेतकऱ्यांसमवेत केली.
शेतकऱ्यांनी या ठिकाणी झालेल्या पिकांच्या नुकसानीबाबत आमदार पाटील यांना माहिती दिली. शेतकरी सरकारकडून भरीव व ठोस मदतीची अपेक्षा करत आहेत. परंतु अद्यापही पंचनाम्याचे नाटक सुरू असल्याने शेतकऱ्यांच्या भावना तीव्र झाल्या आहेत.
या संदर्भात आमदार कैलास पाटील म्हणाले की, “शेतकऱ्यांची फसगत न होता सरकारने तातडीने ठोस आणि भरीव मदत करावी. अन्यथा शेतकऱ्यांचा संताप रस्त्यावर दिसेल.”
शेतकऱ्यांनी सरकारकडे सातत्याने मदतीची मागणी केली असून लवकरात लवकर मदत न झाल्यास आंदोलनाची शक्यता नाकारता येत नाही.