धाराशिव (प्रतिनिधी): प्राथमिक आरोग्य केंद्र येडशी व उपकेंद्र शिंगोली यांच्या वतीने विद्या निकेतन माध्यमिक आश्रम शाळा शिंगोली येथे इयत्ता १ली ते १०वीतील विद्यार्थ्यांना गोवर-रुबेला लस देण्यात आली. या लसीकरण मोहिमेत शाळेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले.
या उपक्रमात वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रणिता क्षीरसागर, आरोग्य सहाय्यक सुर्यकांत गंगावणे, श्रीमती दारफळकर, प्रियंका जाधव, बारकुल मॅडम, पवार मॅडम, राहुल पतंगे, प्रशांत शिंदे, पारगावकर, आशा कोळी, अनिकेत घुगे, अलका मगर, सुनिता राठोड आदी आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी विद्या निकेतन माध्यमिक आश्रम शाळेचे पर्यवेक्षक रत्नाकर पाटील, चंद्रकांत जाधव, खंडू पडवळ, दिपक खबोले, प्रशांत राठोड, कैलास शानिमे, मल्लिनाथ कोणदे, विशाल राठोड, बालिका बोयणे, ज्योती साने मॅडम, तसेच वरिष्ठ लिपिक मस्के संजीवकुमार आदी मान्यवर उपस्थित होते.
तसेच आदर्श प्राथमिक आश्रम शाळेचे मुख्याध्यापक सतीश कुंभार, सचीन राठोड, सुरेखा कांबळे, ज्योती राठोड, कर्मचारी वसंत भिसे, रेवा चव्हाण, सागर सुर्यवंशी, अमोल जगताप आदी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी लसीकरण मोहिमेस सहकार्य केले.
लसीकरणासोबतच या उपक्रमादरम्यान आश्रम शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी रक्तदानही केले. या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.