धाराशिवात मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त ध्वजारोहण तर पंतप्रधान मोदींचा वाढदिवसही विविध उपक्रमांतून साजरा

Spread the love

धाराशिव – मराठवाडा मुक्ती संग्राम दीन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस दोन्ही अगदी उत्साहात साजरा करण्यात आले.
मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त भाजपा जिल्हा कार्यालयात ध्वजारोहण कार्यक्रम पार पडला. भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांच्या मार्गदर्शनाने व जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून मुक्ती संग्राम दिनानिमित्त कु. वसुंधरा गुरव विद्यार्थीनींने मराठवाडा मुक्ती संग्रामाचे ऐतिहासिक महत्त्व उपस्थितांसमोर मांडले तसेच स्वातंत्र्यासाठी प्राणार्पण करणाऱ्या शूरवीरांना अभिवादन करण्यात आले. त्यानंतर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी, धाराशिवतर्फे विविध सेवा उपक्रम राबविण्यात आले. धारासूर मर्दिनी देवीमंदिरात देवीची आरती करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करण्यात आली. त्यानंतर मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम हाती घेऊन स्वच्छ भारत अभियान या संकल्पनेला बळकटी देत नागरिकांना स्वच्छतेचा संदेश देण्यात आला. यानंतर आयोजित रक्तदान शिबिराला कार्यकर्त्यांनी व नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. अनेकांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली. रक्तदान हीच सर्वोच्च सेवा असल्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. या कार्यक्रमास भाजप जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी, नितीन काळे, सतीश दंडनाईक,ॲड.नितीन भोसले, प्रवीण पाठक, अमित शिंदे, विनोद गापाट,अभय इंगळे,प्रीती कदम,राहुल काकडे, युवराज नळे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या उपक्रमांच्या माध्यमातून एकीकडे शूरवीर स्वातंत्र्य सैनिकांच्या स्मृतींना अभिवादन करण्यात आले तर दुसरीकडे देशाच्या नेतृत्वाला शुभेच्छा देत समाजसेवेचा संकल्प करण्यात आला.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!