वाशी तालुक्यातील पारा गावात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पारा या शाळेमध्ये कार्यरत असणारे शिक्षक व शिक्षिका यांची बदली झाली व निरोप समारंभाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला हा कार्यक्रम म्हणजे गुरु शिष्याचे नातं कसं असतं हा पाहण्याचा योग आला ज्यावेळी बदली झालेली शिक्षक शिक्षिका यांचे स्वागत करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या त्यावेळी त्यांनी जे काम केलं त्या कामाची पोच पावती म्हणजे विद्यार्थी व विद्यार्थ्यांना रडू कोसळ हे पाहून शालेय समितीचे अध्यक्ष अंगद विधाते, माजी उपसरपंच संजय (दादा )भराटे, निवृत्त शिक्षक बाबुराव शेळके, व गावातील महिला व पुरुष,पालक यांच्या सुद्धा भावना भावनिक झाल्या, पारा गावची जिल्हा परिषद शाळा तालुक्यातून,जिल्ह्यातून सतत नंबर एक वर राहण्याचा मान मिळाला आहे. शिक्षक हे आज आपल्या शाळेतून निरोप घेत आहेत. याचं दुःख पारा गावातील गावकऱ्यांना,पालकांना व शिक्षण प्रेमींना झालं जर हे दुःख कधीतरी शाळेत जाणाऱ्या पालकांना गावकऱ्यांना झालं असेल तर जी मुलं रडत होती हंबर्डे फोडत होती.ज्यांच रोज सकाळी दहा ते संध्याकाळी चार पर्यंत गुरु शिष्याचं नातं होतं त्यांच्या मनाला किती वेदना होत असतील, हे होण्यासाठी ते गुरु तितके तत्पर,कर्तव्यदक्ष,काळजीपूर्वक प्रत्येक विद्यार्थ्यांचा आदर करून त्या विद्यार्थ्यांमधून गावचं नाव शाळेचे नाव तालुका पातळीवर, जिल्हा पातळीवर,महाराष्ट्र लेव्हलवर, दरवर्षी नवोदयचा रिझल्ट, मंथन परीक्षेत रिझल्ट,क्रीडा क्षेत्रामध्ये रिझल्ट, सांस्कृतिक कार्यक्रम या रूपाने या सर्व शिक्षकांनी पोहोचवलं ते म्हणजे तलवाडा पॅटर्नचे गावकरी सर, शेख सर,जोगदंड सर,पाळवदे मॅडम,हेडमास्तर मोठे सर व त्यांचे सहकारी यांनीअतिशय चांगलं नाव गावचं आणि शाळेचं तालुकास्तरावर व जिल्हा स्तरावर नेण्यासाठी मोलाचा वाटा उचलणारे शिक्षक आज आपल्या गावातून,गावच्या जिल्हा परिषद शाळेचा निरोप व विद्यार्थ्यांचा निरोप घेऊन त्यांच्या पुढील वाटचालीसाठी निघाले त्यावेळी झालेली मनाची अवस्था फार वेदनादायी होती.
गावकरी यांनी सरांशी चर्चा सांगितले मी पारा गावावर उपकार केले नाही मी माझं कर्तव्य पार पाडले आहे आणि माझ्यानंतरही जे शाळेचे नाव तालुकास्तरावर आहे.ते आलेले नवीन शिक्षक पूर्ण करतील अशी मला अपेक्षा आहे हे बोलत असताना त्यांच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा लागल्या व त्यांचे बोलणे त्यांनी बंद केले. नोकरी म्हटलं की बदली होणारच पण ज्या शिक्षकांचे कार्य मेहनत शाळेबद्दल असणारा प्रेम गुरु-शिष्यांचा असणारा नातं यांनी जपलं ते जाताना शिष्याला तर त्याचे दुःख होतच पण त्या गावाला सुद्धा त्याचे दुःख होतं 35 वर्षांमध्ये जे पाहिलं नाही ते आज गुरु शिष्याचं नातं कसं असतं हे अनुभवायला मिळालं असे मत शिक्षकांनी व्यक्त केले आहे.