धाराशिव : राज्यातील 34 जिल्हा परिषदा आरक्षण जाहीर झाले असून धाराशिव जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी यंदा सर्वसाधारण महिला वर्गासाठी आरक्षण निश्चित करण्यात आले आहे.
राज्य शासनाने जाहीर केलेल्या यादीनुसार जिल्हा परिषद अध्यक्षपदांसाठी विविध वर्गांनुसार आरक्षणाची विभागणी करण्यात आली आहे. त्यात धाराशिव जिल्ह्यासाठी सर्वसाधारण महिलांचे आरक्षण लागू झाल्याने जिल्ह्यातील महिला नेतृत्वाला मोठी संधी उपलब्ध झाली आहे.
यामुळे आगामी निवडणुकीत धाराशिव जिल्हा परिषदेच्या राजकीय समीकरणात बदल होण्याची शक्यता वर्तवली जात असून महिला उमेदवारांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.

