शिंगोली (धाराशिव): शिंगोली येथील विद्यानिकेतन माध्यमिक आश्रम शाळा आणि आदर्श प्राथमिक आश्रम शाळेला इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहाय्यक संचालक श्री. अमोल ताकभाते व सहाय्यक निरीक्षक श्री. युवराज भोसले यांनी सदिच्छा भेट दिली.
या दौऱ्यात श्री. अमोल ताकभाते यांनी विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधत त्यांच्या शिक्षण व निवास सुविधांबाबत माहिती जाणून घेतली. अभ्यासाची गुणवत्ता, शिक्षकांचे मार्गदर्शन, उपलब्ध साधनसामग्री या सर्व बाबींची चौकशी करून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर देण्याचे निर्देश दिले.
त्याचप्रमाणे, त्यांनी शालेय अभिलेखांची पाहणी केली तसेच परिसर स्वच्छतेसह वृक्षलागवडीसाठी मार्गदर्शन केले. यावेळी सर्व शिक्षकांना विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी सतत प्रयत्नशील राहण्याचे आवाहन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या निमित्ताने विद्यानिकेतन माध्यमिक आश्रम शाळेचे मुख्याध्यापक अण्णासाहेब चव्हाण व आदर्श प्राथमिक आश्रम शाळेचे मुख्याध्यापक सतीश कुंभार यांनी अमोल ताकभाते व युवराज भोसले यांचा फेटा, शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला.
या कार्यक्रमास रत्नाकर पाटील, चंद्रकांत जाधव, खंडू पडवळ, दिपक खबोले, प्रशांत राठोड, सुधीर कांबळे, मल्लिनाथ कोणदे, कैलास शानिमे, शेषेराव राठोड, विशाल राठोड, सचीन राठोड, इमरान शेख, वरिष्ठ लिपिक संजीवकुमार मस्के, वसतीगृह अधिक्षिका वैशाली शितोळे, सुरेखा कांबळे, श्रद्धा सुर्यवंशी, ज्योती राठोड, ज्योती साने, बालिका बोयणे, गोविंद बनसोडे, रेवा चव्हाण, सचीन अनंतकळवास, अविनाश घोडके, सागर सुर्यवंशी यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.