नवी दिल्ली | प्रतिनिधी
संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली असतानाच देशासाठी एक मोठी आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. भारताचे उपराष्ट्रपती तसेच राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
प्राथमिक वृत्तानुसार, प्रकृतीच्या कारणास्तव त्यांनी हा निर्णय घेतला असून, वैद्यकीय सल्ल्यानुसार राजीनामा सादर केल्याचं सांगितलं जात आहे.
धनखड यांनी ११ ऑगस्ट २०२२ रोजी भारताचे १४वे उपराष्ट्रपती म्हणून कार्यभार स्वीकारला होता. त्यांचं कार्यकाळ अवघ्या दोन वर्षांमध्ये संपल्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
पुढचा मार्ग काय?
सध्यातरी राज्यसभेचे कामकाज उपसभापतींच्या अध्यक्षतेखाली पार पडण्याची शक्यता आहे. लवकरच नवीन उपराष्ट्रपतीसाठी प्रक्रिया सुरू होईल, असा अंदाज व्यक्त होत आहे.
—
महत्वाचे मुद्दे:
उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचा अचानक राजीनामा
प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
राज्यसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मोठी घटना
राजकीय वर्तुळात उलथापालथ