एक पेड मॉच्या नावाने वृक्ष लागवड | १५ लाख झाडांचे वृक्षारोपण | हरित धाराशिव अभियान
धाराशिव : “वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे” या संत तुकाराम महाराजांच्या शिकवणुकीला अनुसरून, धाराशिव जिल्ह्यातील ‘हरित धाराशिव’ अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ‘एक पेड मॉ के नाम’ या अभिनव संकल्पनेअंतर्गत जिल्हा प्रशासन, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांच्या सहकार्याने अवघ्या एका दिवसात तब्बल १५ लाख वृक्षांची लागवड करण्यात आली.
या ऐतिहासिक उपक्रमाचे नेतृत्व जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी अत्यंत प्रेरणादायी पद्धतीने केले. त्यांच्या कार्याचे जितके कौतुक केले जाईल, ते कमीच आहे. आई जशी आपल्या बाळाला जपते, वाढवते तशीच आपली जबाबदारी या झाडांप्रती असावी, हा संदेश या उपक्रमातून दिला गेला.
या संकल्पनेला जिल्ह्यातील विविध शाळा व शैक्षणिक संस्थांनी देखील उत्तम प्रतिसाद दिला. या निमित्ताने झालेल्या कार्यक्रमात खालील मान्यवर व शिक्षकवर्ग उपस्थित होता:
शिक्षणाधिकारी सुधा साळुंके
गट शिक्षणाधिकारी असरार सय्यद
मुख्याध्यापक सुनील चव्हाण, श्रीपती जमाले, अण्णासाहेब चव्हाण, सतीश कुंभार
पर्यवेक्षक: रत्नाकर पाटील, प्रशांत राठोड, चंद्रकांत जाधव, दिपक खबोले, सुधीर कांबळे
मुख्य लिपीक: संजीव मस्के
शिक्षक/शिक्षकेतर कर्मचारी: कैलास शानिमे, मल्लिनाथ कोणदे, विशाल राठोड, शेषेराव राठोड, सुरेखा कांबळे, श्रद्धा सुर्यवंशी, ज्योती राठोड, ज्योती साने, बालिका बोयणे, गोविंद बनसोडे, वसंत भिसे, अविनाश घोडके, सागर सुर्यवंशी, रेवा चव्हाण, सचिन अनंतकळवास आणि इतर अनेक जण उपस्थित होते.
विद्यार्थ्यांचा सहभाग हे या उपक्रमाचे विशेष वैशिष्ट्य ठरले. जिल्हा प्रशासनाने दिलेल्या या पर्यावरण पूरक संदेशाने नक्कीच धाराशिवच्या हरित भविष्यास दिशा दिली आहे.
धाराशिव जिल्ह्यात ‘एक पेड मॉ के नाम’ उपक्रमांतर्गत एकाच दिवशी १५ लाख वृक्ष लागवड करण्यात आली. जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार व CEO डॉ. मैनाक घोष यांच्या नेतृत्वात हरित धाराशिव अभियानाला मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद.
धाराशिव वृक्षारोपण, एक पेड मॉ के नाम, हरित धाराशिव, वृक्ष लागवड मोहिम, गिनीज बुक रेकॉर्ड वृक्षारोपण, जिल्हाधिकारी धाराशिव, मैनाक घोष, पर्यावरण, शिक्षक सहभाग, वृक्षवल्ली