धाराशिव,दि.८ जुलै : ग्राम विकास विभागाने जिल्ह्यातील ६२१ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे सन २०२५ ते २०३० या कालावधीसाठी आरक्षण निश्चित केले आहे.महाराष्ट्र ग्रामपंचायत (सरपंच व उपसरपंच) निवडणूक नियम,१९६४ मधील नियम २-अ व शासन अधिसूचना क्र.८७,दिनांक ५ मार्च २०२५ नुसार ही प्रक्रिया केली जात आहे.
तालुक्यातील अनुसूचित जाती, जमाती,नागरिकांचा मागास प्रवर्ग व सर्वसाधारण प्रवर्गासाठी तसेच त्या-त्या जाती,जमाती व प्रवर्गातील महिलांसाठी ग्रामपंचायतीची लोकसंख्या सन २०११ च्या जनगणनेनुसार आरक्षण निश्चित केले आहे.
आरक्षण प्रक्रिया पारदर्शकपणे पार पडावी यासाठी स्थानिक वृत्तपत्रातून व दवंडीव्दारे व्यापक प्रसिद्धी देण्याचे निर्देश आहेत.आरक्षण कार्यक्रमाची चित्रफीत तयार करून तसेच उपस्थितांची स्वाक्षरीसह संपूर्ण कार्यवाहीचे दस्तावेजीकरण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी दिले आहे.
ग्रामपंचायत सरपंच पदाचे तालुका स्तरावरील आरक्षण खालील प्रमाणे आहे धाराशिव तालुक्यातील ११० ग्रामपंचायतपैकी अनुसूचित जातीसाठी १९ ग्रामपंचायतमध्ये सरपंचाचे आरक्षण असणार आहे त्यापैकी ९ महिलांसाठी राखीव असणार आहे.अनुसूचित जमातीसाठी एकूण ४ ग्रामपंचायतमध्ये सरपंच पदे आरक्षित असणारा असून त्यापैकी २ ठिकाणी अनुसूचित जमातीच्या महिलांसाठी सरपंच पद आरक्षित असणार आहे. नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी आरक्षित असणाऱ्या ३० ग्रामपंचायतीपैकी १५ ग्रामपंचायतमध्ये महिलांसाठी सरपंच पद आरक्षित असणार असून खुल्या प्रवर्गातील ५७ ग्रामपंचायतींपैकी २९ ग्रामपंचायतींमध्ये महिलांसाठी सरपंच पद आरक्षित असणार आहे.
तुळजापूर तालुक्यातील १०८ ग्रामपंचायतीपैकी अनुसूचित जातीसाठी १८ ग्रामपंचायतीत अनुसूचित जातीसाठी सरपंच पद आरक्षित असून ९ ठिकाणी महिलांचे आरक्षण असणार आहे.अनुसूचित जमातीसाठी एक ग्रामपंचायत असून नागरिकांचा मागासवर्ग यासाठी २९ ग्रामपंचायतपैकी १५ ग्रामपंचायतीमध्ये सरपंच पदे महिलांसाठी असणार आहे तर खुल्या प्रवर्गातील ६० ग्रामपंचायतीपैकी ३० ग्रामपंचायतीसाठी महिला सरपंच पद आरक्षित असणार आहे.
उमरगा तालुक्यातील ८० ग्रामपंचायतीमध्ये १३ ग्रामपंचायतीत अनुसूचित जातीसाठी सरपंच पद आरक्षित असून ७ ठिकाणी महिला सरपंच असणार आहेत.याचप्रमाणे अनुसूचित जमातीसाठी २ ग्रामपंचायती असून १ महिला आरक्षण,नागरिकांचा मागास प्रवर्ग साठी २२ ग्रामपंचायती आरक्षित असून ११ ठिकाणी महिला तर खुल्या प्रवर्गात ४३ ग्रामपंचायती असून २१ ठिकाणी महिलांना संधी मिळणार आहे.
लोहारा तालुक्यात ४४ ग्रामपंचायतीमध्ये ७ ग्रामपंचायत अनुसूचित जातीसाठी,त्यापैकी ३ जागा महिलांसाठी,१२ ग्रामपंचायती नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी त्यापैकी महिलसाठी ६ जागा,२५ ग्रामपंचायती खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित असून यामध्ये तेरा ग्रामपंचायती या महिलांसाठी राखीव असणार आहेत.
याप्रमाणेच कळंब मधील ९२ ग्रामपंचायतमध्ये अनुसूचित जातीसाठी १८ जागा त्यापैकी ९ जागा महिलासाठी,अनुसूचित जमातीसाठी २ जागा,त्यापैकी १ जागा महिलांसाठी,नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी २५ जागा, त्यापैकी १२ जागा महिलासाठी तर खुल्या प्रवर्गासाठी ४७ ग्रामपंचायतीमध्ये आरक्षण पदाचे आरक्षण निश्चित होणार आहे,यामध्ये २४ जागा महिलांसाठी आहे.१८ अनुसूचित जातीसाठी तर त्यापैकी ९ जागा महिलांसाठी,२ अनुसूचित जमाती,त्यापैकी १ महिलासाठी राखीव.२५ नागरिकांचा मागास प्रवर्ग साठी त्यापैकी महिलांसाठी १२ जागा,४७ खुला प्रवर्ग एकूण त्यापैकी २४ महिलांसाठी राखीव असणार आहे.
वाशी तालुक्यातील ४१ ग्रामपंचायतमध्ये ६ अनुसूचित जातीसाठी त्यापैकी महिलासाठी ३ जागा,२ अनुसूचित जमातीसाठी त्यातील १ महिलेसाठी,११ नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी त्यातील ६ महिलसाठी,२२ खुले प्रवर्गासाठी सरपंच पदाचे आरक्षण असणार आहे,त्यापैकी महिलासाठी ११ जागा,६ अनुसूचित जातीसाठी ३ महिलांसाठी,२ अनुसूचित जमाती त्यापैकी १ महिलासाठी.११ जागा नागरिकांचा मागास प्रवर्ग त्यापैकी महिलांसाठी ६ जागा,२२ खुल्या प्रवर्गासाठी त्यापैकी ११ महिलांसाठी आरक्षित असणार आहे.
भूम तालुक्यातील ७४ ग्रामपंचायतीमध्ये १० ग्रामपंचायती अनुसूचित जातीसाठी आरक्षित असणारा असून यामध्ये पाच जागा या महिलांसाठी असणार आहेत तर अनुसूचित जमातीसाठी आरक्षित असणाऱ्या एक ग्रामपंचायतमध्ये एक जागा आहे.ही अनुसूचित जमातीच्या महिलेसाठी आरक्षित असणार आहे. तर नागरिकांचा मागास प्रवर्ग यासाठी आरक्षित असणारे २० जागांपैकी १० ग्रामपंचायतमध्ये सरपंच पद हे महिलांसाठी राखीव असणार आहे तर खुल्या प्रवर्गातील आरक्षित असणारे ४३ जागांपैकी २१ ग्रामपंचायतमध्ये महिलांसाठी सरपंच पद आरक्षित असणार आहे.
परंडा तालुक्यातील ७२ ग्रामपंचायतपैकी ९ ग्रामपंचायतमध्ये अनुसूचित जातीसाठी सरपंच पद आरक्षित असून त्यापैकी पाच ग्रामपंचायतीमध्ये महिलांसाठी तर अनुसूचित जमासाठी आरक्षण असणाऱ्या एक ग्रामपंचायतमध्ये एक महिलांसाठी नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी आरक्षित असणाऱ्या १९ ग्रामपंचायतपैकी नऊ ग्रामपंचायत मध्ये महिलांना सरपंच पद आरक्षित असणार आहे तर खुल्या प्रवर्गातील ४३ ग्रामपंचायतीमध्ये २१ ग्रामपंचायतीत महिलांना संधी मिळणार आहे.