सहकारातून स्वावलंबनाची दिशा, सहकार दिनानिमित्त विद्यार्थ्यांना दत्ताभाऊ कुलकर्णी यांचे मार्गदर्शन

Spread the love

श्री.सिद्धीविनायक बँकेच्या जनरल बॉडीच्या मीटिंगला विद्यार्थ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन

धाराशिव- शहरातील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात श्रीसिद्धिविनायक परिवाराच्या वतीने सहकार सप्ताह दीन साजरा करण्यात आला या आयोजित विशेष कार्यक्रमात अध्यक्ष म्हणून प्राचार्य डॉ. संदीप देशमुख तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून श्री. सिद्धीविनायक परिवाराचे संस्थापक आणि भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी होते. यावेळी कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांशी सहकार या विषयावर प्रेरणादायी संवाद साधला. सहकार म्हणजे केवळ संस्था चालविणे नव्हे, तर ती लोकसहभागातून उभी राहिलेली लोककल्याणकारी चळवळ आहे. युवकांनी रोजगाराच्या मागे धावण्याऐवजी सहकार क्षेत्रातील संधी ओळखून स्वतः उद्योजक बनावे, असे आवाहन केले. दरम्यान आपल्या भाषणात सहकाराची ऐतिहासिक पार्श्वभूमी, महाराष्ट्रातील सहकार चळवळीचा विकास, ग्रामीण भागातील सहकारी संस्थांची भूमिका तसेच श्री. सिद्धीविनायक परिवाराच्या माध्यमातून सहकार क्षेत्रात त्यांनी केलेल्या कार्याचा अनुभव विद्यार्थ्यांपुढे उलगडून दाखवला. या कार्यक्रमात वाणिज्य शाखेतील असंख्य विद्यार्थी व विद्यार्थिनींची उपस्थिती लक्षणीय होती. सहकार क्षेत्राचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी श्रीसिद्धीविनायक बँकेच्या जनरल बॉडी मीटिंगला उपस्थित राहावे, असे आवाहन केले. यावेळी कार्यक्रमास उपप्राचार्य बबन सूर्यवंशी, प्रा. डॉ. अभय देशमाने वाणिज्य शाखेतील विद्यार्थी-विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ. वैभव आगळे यांनी केले,तर कार्यकारी संचालक गजानन पाटील यांनी आभार मानले.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!