तुळजापूर (प्रतिनिधी) – तुळजापूर शहरातील हुतात्मा स्मारक ते पावनार गणपती मार्गाचे रुंदीकरण तातडीने व्हावे, या मागणीसाठी अमोल जाधव यांच्यासह शिवसेनेच्या शिष्टमंडळाने महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे यांची मुंबई येथे भेट घेतली.
या शिष्टमंडळात जिल्हा प्रमुख मोहन पनुरे, शहर प्रमुख बापूसाहेब भोसले, उपशहर प्रमुख रमेश (काका) चिवचिवे, भुजंग मुखेडकर, संभाजी नेपते आदी पदाधिकारी सहभागी होते.
या बैठकीत रस्त्याच्या विद्यमान परिस्थितीवर सविस्तर चर्चा झाली. नागरिकांना होणाऱ्या अडचणी, वाहतूक कोंडी आणि सुरक्षिततेचे प्रश्न अधोरेखित करण्यात आले.
उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी या मागणीची गांभीर्याने दखल घेत लवकरच मंत्रालयात विशेष बैठक घेऊन रस्त्याच्या रुंदीकरणासंदर्भात सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन दिले.
या मार्गाचे रुंदीकरण झाल्यास तुळजापूर शहरातील वाहतूक सुरळीत होईल आणि पावनार गणपती यात्रेसह भाविकांना दिलासा मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे