शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी कवड्याची माळ, कुंकूसह मानाची साडी रायगडी रवाना

Spread the love

तुळजापूर – छञपती शिवाजी महाराज यांच्या ६ जुन रोजी रायगडावर होणाऱ्या ३५१ व्या शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी सोमवार दि.२ रोजी श्री तुळजाभवानी मातेच्या सिंहगाभाऱ्यातून कवड्याची माळ व कुंकु देवीचरणी लावुन व शिरकाई देवीला मानाची साडीचोळी हे साहित्य रायगडाकडे रवाना करण्यात आले.

श्री तुळजाभवानी मातेची दुग्धअभिषेक पुजा झाल्यानंतर देविजीस वस्ञोलंकार घालण्यात आले, नित्योपचार पुजा संपन्न झाल्यानंतर देविजींच्या चरणी सात अबुंकी कवड्यांच्या माळ, कुंकु लावुन हे सर्वसाहित्य आणि रायगडस्थित शिरकाई देविमातेस तिर्थक्षेञ तुळजापूर येथिल मानाची साडी चोळी शिवराज्याभिषेक सोहळा समिती रायगड सदस्य सतिश खोपडे यांनी युवराज्ञी सौ. संयोगिताराजे यांच्याकडे सुर्पत करण्यात येणार आहे.

मंदिर संस्थान धार्मिक व्यवस्थापक रामेश्वर वाले, सहव्यवस्थापक विश्वास कदम,पत्रकार संघाचे जिल्हा उपाध्यक्ष श्रीकांत कदम,पुजारी नगर फाऊंडेशनचे अध्यक्ष गणेश पुजारी यांच्याकडून
चोपदार द्वारापाशी हे साहित्य अखिल भारतीय शिवराज्याभिषेक सोहळा समिती किल्ले रायगड सदस्य व मानकरी सतिश खोपडे,अभियंता श्लेषा खोपडे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.

याप्रसंगी पत्रकार संघ तालुका उपाध्यक्ष ज्ञानेश्वर गवळी,शहर उपाध्यक्ष सुरज बागल,अनिल आगलावे,महेश शिंदे ,शेखर फुगारे आदी शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तुळजापूर येथुन हे साहित्य ५ जूनला रायगडावर पोहचणार असुन यातील पाच कवड्याच्या माळा रायगडावरील छञपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास घालण्यात येणार आहे. कुंकू हे सदरेवरिल छञपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास लावण्यात येणार आहे. तर मानाची साडी शिरकाई देविमातेस अर्पण केली जाणार आहे.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!