कार्यालयीन स्वच्छता आणि कार्यक्षमता वाढीसाठी जिल्हाधिकारी पूजार यांचे निर्देश

Spread the love

धाराशिव,दि.१३ मार्च ) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार,राज्यभरात ७ जानेवारी ते १६ एप्रिल २०२५ या कालावधीत १०० दिवसांची कार्यालयीन सुधारणा विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. या मोहिमेच्या अनुषंगाने, जिल्हाधिकारी कीर्ती किरण पूजार यांनी जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयांना त्यांच्या कार्यालयांची नियमित स्वच्छता राखून, कर्मचाऱ्यांनी कार्यक्षमता वाढवून नागरिकांची कामे वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत.

मुख्यमंत्री कार्यालयाचे सचिव श्री. श्रीकर परदेशी यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे राज्यातील विविध यंत्रणांचा या मोहिमेचा आढावा घेतला.त्यानंतर जिल्हाधिकारी श्री. पूजार यांनी जिल्हास्तरीय यंत्रणांचा आढावा घेतला.

या आढावा बैठकीला डॉ.मैनाक घोष, मुख्य कार्यकारी अधिकारी,जिल्हा परिषद,श्रीमती शफकत आमना, अपर पोलीस अधीक्षक,शोभा जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी,शिरीष यादव, उपजिल्हाधिकारी विलास जाधव,अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी,स्वाती शेंडे,जिल्हा पुरवठा अधिकारी,रवींद्र माने,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, श्री.बळे,महाव्यवस्थापक,जिल्हा उद्योग केंद्र,बी.एस.पोळ,विभागीय वन अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्याम गोडभरले आणि देवदत्त गिरी,उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री.चव्हाण आणि श्री.भंडे,कार्यकारी अभियंता,सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच इतर विभाग प्रमुख उपस्थित होते.

सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांनी कार्यालय आणि परिसर स्वच्छ ठेवावा.स्वच्छ वातावरणामुळे कार्यक्षमता वाढते.सर्व अधिकारी कर्मचारी कार्यालयीन वेळेत उपस्थित राहावेत.असे निर्देश श्री.पुजार यांनी यावेळी दिलें.

नागरिकांची कामे वेळेत पूर्ण करून त्यांना अनावश्यक त्रास होऊ नये.जिल्ह्यातील पर्यटन स्थळांवर स्वच्छता मोहिम राबवून ते रमणीय आणि सुशोभित करावेत.असे सांगून श्री.पुजार म्हणाले,शहरी भागात नगरपालिकांनी रस्त्यांच्या दोन्ही बाजू स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी पार पाडावी,असे सांगितले.

तालुकास्तरीय यंत्रणांचे प्रमुख अधिकारी ऑनलाईन पद्धतीने या आढावा सभेत सहभागी झाले होते.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!