जिल्हाधिकाऱ्यांनी केली धाराशिवच्या कचरा डेपोची पाहणी , पावसाळ्यापूर्वी कचऱ्यावर प्रक्रिया करण्याचे दिले निर्देश , कचरा डेपो स्थलांतरित ?

Spread the love

धाराशिव दि.९ मार्च ) जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी आज ९ मार्च रोजी धाराशिव शहरातील कचरा संकलित करण्यात येणाऱ्या कचरा डेपोला भेट दिली.यावेळी त्यांच्यासोबत नगरपालिका प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त अजित डोके,सहाय्यक मुख्याधिकारी पृथ्वीराज पवार,धाराशिव नगरपालिकेचे अधीक्षक श्री.कुलकर्णी,बांधकाम अभियंता श्री.दुबे,स्वच्छता विभागाचे विलास गोरे, लेखापाल अशोक फडतरे प्रामुख्याने उपस्थित होते.

येत्या पावसाळ्यापूर्वी कचरा डेपोत असलेल्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यात यावी व या कचऱ्याचे विलगीकरण करून त्यापासून खत निर्मितीचे काम पावसाळयापूर्वी पूर्ण करण्यात यावे,असे निर्देश जिल्हाधिकारी श्री.पुजार यांनी नगरपालिका प्रशासनाला यावेळी दिले.

शहरातून दररोज किती कचरा संकलित होतो व कचरा डेपोत आलेल्या कचऱ्यावर आतापर्यंत किती प्रमाणात प्रक्रिया झाली आहे याबाबतची माहिती श्री.पुजार यांनी यावेळी घेतली.तसेच कचरा डेपोसाठी यापूर्वी विस्तृत प्रकल्प अहवाल हा ९० क्युबिक टन कचऱ्याचे विलगीकरण करून त्यापासून खत निर्मिती प्रस्तावित होते,त्याचे जवळपास ८० टक्के काम पूर्ण झाल्याची माहिती श्री.डोके यांनी यावेळी दिली.

कचरा डेपोत आणखीही कचरा मोठ्या प्रमाणात शिल्लक आहे,त्यामुळे या कचऱ्यावर प्रक्रिया त्वरित करण्याचे निर्देश श्री.पुजारने दिले.प्रस्तावित विस्तृत प्रकल्प अहवाल हा साडेसहा कोटी रुपयांचा असून प्रशासकीय मान्यतेसाठी प्रस्तावित आहे. जवळपास १४ एकरमध्ये हा कचरा डेपो असल्याचे श्री.डोके यांनी सांगितले.

कचरा डेपोच्या प्रस्तावित विस्तृत प्रकल्प अहवालाबाबत लवकरच बैठक घेण्यात येईल व या बैठकीत प्रस्तावित विस्तृत प्रकल्प अहवालावर चर्चा करून निर्णय घेण्यात येईल असे श्री पुजार यावेळी म्हणाले.

शहरातील कचरा डेपो हलवा नागरिकांची मागणी आंदोलन देखील झाले.

धाराशिव शहरातील परिसरामध्ये असलेले कचरा डेपो हलवा यासाठी शहरातील नागरिकांनी रस्ता रोको आंदोलन केले आहे तर प्रशासनाने याबाबत दोन महिन्याच्या वेळ मागितले आहे त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी या कचरा डेपोची पाहणी केल्याने नागरिकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. व तात्काळ शहरातील ही कचरा डेपो स्थलांतरित होईल अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करताना दिसत आहेत


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!