तुळजापूरच्या ड्रग माफियाचा आका कोण? पालकमंत्री यांनी दिलेलं अल्टिमेट संपलं
पोलिसांच्या भूमिकेकडे सर्वसामान्यांचे लक्ष!
तुळजापूर आणि परंडा परिसरातील एमडी ड्रग्ज तस्करी प्रकरणाने संपूर्ण मराठवाड्यात खळबळ उडवली आहे. या प्रकरणात पोलिसांनी काही मोठ्या आरोपींना अटक केली असली, तरी या ड्रग माफियाचा मुख्य सुत्रधार नेमका कोण आहे, हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे.
मुख्य आरोपी कोण?
फेब्रुवारी २०२५ मध्ये तुळजापूर पोलिसांनी मोठी कारवाई करत स्वराज उर्फ पिनू तेलंग आणि मुंबईतील संगीता गोळे यांना अटक केली. तसेच, अमित उर्फ चिमू अशोकराव आरगडे, युवराज देविदास दळवी, आणि नळदुर्ग येथील संदीप संजय राठोड हे देखील या प्रकरणात अटकेत आहेत. या टोळीवर एमडी ड्रग्जचा मोठ्या प्रमाणावर पुरवठा आणि तस्करीचे आरोप ठेवण्यात आले आहेत.
ड्रग माफियाचा आका कोण?
ही टोळी फक्त माध्यमांमध्ये समोर आलेला एक भाग असू शकतो. मुख्य सूत्रधार अद्याप पडद्यामागे असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या तस्करीच्या जाळ्यात आणखी कोण सामील आहे? त्याला कोणाचा राजकीय किंवा प्रशासकीय आश्रय मिळतोय का? या सर्व प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी तपास सुरू आहे.
पोलिसांचा तपास आणि जनतेचा रोष
पोलिस अधीक्षक संजय जाधव आणि उपविभागीय अधिकारी डॉ. निलेश देशमुख यांच्या नेतृत्वाखाली तपास वेगाने सुरू आहे. मात्र, स्थानिक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
महत्त्वाचे मुद्दे:
- एवढ्या मोठ्या प्रमाणात ड्रग्जचा पुरवठा तुळजापूरमध्ये कसा आणि कुठल्या मार्गाने सुरू होता?
- या व्यवसायामध्ये स्थानिक गुन्हेगारांबरोबर मोठे मासे तर नाहीत ना?
- काही राजकीय नेते किंवा प्रभावशाली व्यक्ती यात सहभागी आहेत का?
- पोलिसांनी यापूर्वीच ही टोळी उद्ध्वस्त का केली नाही?
जनतेची मागणी – सत्य समोर यावे!
तुळजापूर हा धार्मिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाचा भाग आहे. येथे एवढ्या मोठ्या प्रमाणावर ड्रग्जचा व्यापार चालू असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. स्थानिक रहिवासी आणि सामाजिक संघटनांनी मुख्य सूत्रधाराचा शोध घेऊन त्याच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
पुढील काही दिवस महत्त्वाचे!
या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, ड्रग माफियाचा खरा आका कोण आहे हे स्पष्ट होण्यासाठी आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे. पोलिस तपासाच्या दिशेने सर्वसामान्यांचे लक्ष लागले आहे.
पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलेल्या अल्टिमेट संपलं
पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी पुजारी मंडळाच्या तक्रारीनंतर पोलीस प्रशासनाला 72 तासाचा अल्टिमेट दिला होता मात्र तो अल्टिमेट देखील संपला आहे तर पोलिसांच्या कारवाईवर संशय निर्माण होत असल्याची प्रतिक्रिया सर्वसामान्य नागरिकांनी येत आहे. ड्रग माफ्याचा खरा चेहरा समोर आणावा व पोलिसांची प्रतिमा कायम ठेवावी. कोणालाही पाठीशी घालू नये अशी प्रतिक्रिया तुळजापूर व धाराशिव जिल्ह्यातील नागरिक देत आहेत.