बार्शी: पुणे शहरातील गणेश नगर, धायरी येथील रहिवासी वैभव रामदासी यांची कन्या कु. वैष्णवी मानसी वैभव रामदासी हिची ‘कौन बनेगा करोडपती जूनियर’ (KBC Junior) मध्ये फास्टेस्ट फिंगर फर्स्ट या स्पर्धेतून हॉट सीटसाठी निवड झाली आहे.
कु. वैष्णवी मानसी वैभव रामदासी ही महानायक अमिताभ बच्चन यांच्यासमवेत 5 फेब्रुवारी आणि 6 फेब्रुवारी 2025 रोजी रात्री 9 वाजता सोनी एंटरटेनमेंट चॅनेलवर झळकणार आहे.
विशेष म्हणजे, वैष्णवीचे वडील वैभव रामदासी हे पुण्यात इन्फोसिसमध्ये कार्यरत असून, त्यांचे वडील कै. अशोक रामदासी हे बार्शीतील बीएसएनएल कार्यालयात कार्यरत होते.
अशी झाली निवड:
सुरुवातीला जनरल नॉलेजची परीक्षा, त्यानंतर मुलाखत, आणि देशभरातील 150 मुलांमधून अंतिम 10 जणांची फास्टेस्ट फिंगर फर्स्टसाठी निवड झाली. शेवटी अंतिम निवड होऊन वैष्णवीला हॉट सीटवर बसण्याची संधी मिळाली.
ही बातमी बार्शी आणि पुण्यासाठी अभिमानास्पद क्षण आहे. वैष्णवीला पुढील खेळासाठी मनःपूर्वक शुभेच्छा!
#BarshiTimes #KBCJunior #VaishnaviOnKBC #AmitabhBachchan #BarshiPride #SonyTV #HotSeat