धाराशिव ता. 8: विविध महामंडळाच्या वतीने जाती समूह व वेगवेगळ्या प्रवर्गातील लोकांना लाभ दिला जातो. अशा सर्वच महामंडळाची विस्तृत बैठक सोमवार (ता. दहा ) जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित केली आहे. आमदार कैलास पाटील यांनी केलेल्या मागणीनुसार ही बैठक होणार आहे. यामध्ये जिल्ह्यातील सर्व महामंडळाचे मुख्य अधिकारी तसेच सर्व बँकाचे प्रमुख अधिकारी उपस्थित राहणार आहेत. तरी ज्याना लाभ मिळण्यासाठी काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या असतील अश्या नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन आमदार कैलास पाटील यांनी केले आहे. सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालय येथे दुपारी चार वाजता ही बैठक होणार आहे असे आमदार पाटील यांनी कळविले आहे.