क. तडवळे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक पूर्ण होण्यासाठी 12 कोटी 86 लाख रुपये निधी द्यावा – आमदार कैलास पाटील

Spread the love

धाराशिव ता. 5: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मौजे कसबे तडवळा ता. जि. धाराशिव येथे दिनांक 22 व 23 फेब्रुवारी 1941 रोजी महार मांग वतनदार परिषद घेतली होती. त्याकरिता त्यांनी मौजे कसबे तडवळा ता. जि. धाराशिव येथे मुक्काम देखील केला होता. महाराष्ट्र राज्यातील एकुण २८ ऐतिहासिक व सांस्कृतीक स्थळे/ ठिकाणे निवड केली आहे. मात्र जागेअभावी हा प्रश्न रखडला होता पण त्यावर मार्ग काढून त्याचा प्रस्ताव सोळा महिन्यापासून सरकार दरबारी पडून आहे. त्याला मंजुरी देऊन ही कामे अधिक गतीने करावी अशी मागणी आमदार कैलास पाटील यांनी सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाठ यांच्याकडे केली आहे. त्यांची भेट घेऊन आमदार पाटील यांनी संपूर्ण माहिती दिली आहे.
पाटील यांनी म्हटले की, कसबे तडवळे ता.धाराशिव येथील सार्वजनिक वाचनालय, क्रांतीस्तंभ व इतर कामासाठी प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली असुन सदर प्रकल्पासाठी आयुक्तालयाकडुन निधी वितरण करण्यात आलेला आहे.
कसबे तडवळे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने सार्वजनिक वाचनालय व क्रांतीस्तंभ जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेच्या जागेवर बांधण्याकरिता पर्यायी जागा उपलब्ध नाही. त्यामुळं स्मारकाचे काम रखडले. समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त यांनी १२ ऑक्टोबर २०२२ रोजी जिल्हा प्रशासनातील अधिकारी, गावकरी व सामाजिक कार्यकर्ते यांच्या समवेत कसबे तडवळे येथे बैठक घेतली. बैठकीमध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अन्य ठिकाणी बांधुन दिल्याशिवाय स्मारकाचे काम होणार नाही असे जिल्हाधिकारी, धाराशिव यांनी कळविण्यात आले. जिल्हा परिषद शाळा बांधणेसाठी व येथील जागा भुसंपादनाच्या नुकसान भरपाईसह मावेजा उपलब्ध करुन देण्याचा निर्णय झालेला आहे. शाळेची इमारत बांधकामासाठी दहा कोटी ८६ लाख व जागेचा मावेजा एक कोटी ९७ लाख असे एकुण १२ कोटी ८३ लाख रुपये रक्कम वितरीत करण्याबाबतचा प्रस्ताव आपल्या कार्यालयास २० ऑक्टोबर २०२३ रोजी प्राप्त झाला असल्याच आमदार पाटील यांनी सांगितले.हा प्रस्ताव मागील एक वर्ष चार महिन्यांपासून आपल्या कार्यालयाकडे प्रलंबित असुन त्यावर अद्यापपर्यंत कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही.या प्रस्तावाला मान्यता देऊन तात्काळ निधी वितरीत करणे आवश्यक आहे. याबाबत या विभागाशी मी वेळोवेळी पत्राव्दारे मागणी केले असल्याच पाटील यांनी म्हटले आहे. कसबे तडवळे ता. धाराशिव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या इमारत बांधकामासाठी निधी मंजुर करण्याचा प्रस्तावास मंजुरी द्यावी अशी मागणी आमदार पाटील यांनी मंत्री ना. शिरसाठ यांच्याकडं केली आहे.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!