माता रमाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शाहिर साठे व माळी यांच्या जलसा कार्यक्रमाचे आयोजन

Spread the love

धाराशिव दि.५ (प्रतिनिधी) – माता रमाई आंबेडकर यांच्या १२६ व्या जयंतीनिमित्त क्रांतीशाहीर शीतल साठे व सचिन माळी यांचा प्रबोधनात्मक शाहिरी जलसा कार्यक्रमाचे आयोजन दि.७ फेब्रुवारी रोजी करण्यात आले आहे.
माता रमाई भीमराव आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त धाराशिव येथील रमाई फाउंडेशनच्यावतीने क्रांती शाहीर शितलताई साठे व सचिन माळी यांचा प्रबोधनात्मक शाहिरी जलसा….केवळ कर्मणूक नाही तर महामानवांच्या विचाराचा जागर….या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम धाराशिव येथील लेडीज क्लबच्या मैदानावर सायंकाळी ६ वाजता होणार आहे. या कार्यक्रमास सर्वच घटकातील स्त्री व पुरुष यांनी सहपरिवार उपस्थित रहावे, असे आवाहन आप्पासाहेब शिरसाठ, अमोल वाघमारे, अमरशक्ती चिलवंत, विनोद जाधव, शिलरत्न भालशंकर, कैलास शिंदे, सोमनाथ गायकवाड, सचिन दिलपाक, राहुल वाघमारे, स्वराज जानराव, मुकेश मोटे व नितीन लांडगे यांनी केले आहे.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!