राया वाटलं होतं तुम्ही यालऽऽ…, विचार काय हाय तुमचा.. , नृत्य कलाकारांसह रसिकांनीही धरला लावणीवर ठेका
धाराशिव, दि. 18 –
राया वाटलं होतं तुम्ही यालऽऽ.., विचार काय हाय तुमचा हो पावणं.. या प्रसिध्द लावण्यांसह तुझ्यासाठी आले वनात…. या गवळण गीतांवर नृत्य कलाकारांसह रसिकांनी ठेका धरून जल्लोष केला. रसिकांनी नृत्य कलाकारांना टाळ्या, शिट्ट्या आणि वन्समोअरचा आग्रह धरून त्यांच्या कलेला मन भरून दाद दिली. निमित्त होते शंभराव्या नाट्य संमेलनानिमित्त अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या धाराशिव शाखेच्यावतीने आयोजित सांस्कृतिक महोत्सवाचे.
शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात 15 ते 18 ऑगस्ट दरम्यान सांस्कृतिक महोत्सव सुरू आहे. महोत्सवाच्या तिसर्या दिवशी शनिवार, 17 ऑगस्ट रोजी सुगम संगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते नटराजाचे पूजन करून व सिने अभिनेते दिवंगत विजय कदम यांना श्रध्दांजली वाहून उद्घाटन करण्यात आले.
यावेळी महोत्सवाचे स्वागताध्यक्ष धनंजय शिंगाडे, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद कार्यकारिणी सदस्य विशाल शिंगाडे, तेजस्विनी कदम, यतीराज वाकळे, नाट्य परिषदेचे कोषाध्यक्ष सतीश लोटके, मुंबई विद्यापीठातील लोककला विभागाचे प्रमुख डॉ. गणेश चंदनशिवे, अहिल्यानगर शाखेचे अध्यक्ष अनंत जोशी, उपजिल्हाधिकारी शोभा जाधव , जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे उपस्थित होते.
पारंपारिक लावणी महोत्सवात लावण्यवती तनुजा शिंदे (लातूर), अंकिता माने, अपर्णा पवार, अंबिका आगळे, निकिता साळुंके, दिशा सोनटक्के, रिया राठोड, प्रतिक्षा गुंडरे, शुभम खोत, किरण कोरे श्रावणी हराळकर, पवन चव्हाण (अहिल्यानगर), आदिती केंद्रे (नांदेड) निकिता साळुंके आदींनी एकापेक्षा एक पारंपारिक लावणीनृत्य सादर केले.
यावेळी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद च्या वतीने सहभागी कलाकारांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
तनुजा शिंदे हिने राजसा विडा रंगला ओठी, श्रावणी हराळकर हिने कचकच कांदा, दिशा सोनटक्के हिने घ्याल का हो राया एक शालू बनारसी, प्रियंका पोतदार हिने राया वाटलं होतं तुम्ही याल, पवन चव्हाण याने तुझ्यासाठी आले वनात, किरण कोरे याने बाई गं पिचली माझी बांगडी, शुभम खोत याने विचार काय हाय तुमचा हो पावणं अशा एक से बढकर एक लावणी गीतांवर नृत्य सादर करून उपस्थित रसिकांना खिळवून ठेवले. कलाकारांच्या या सादरीकरणाला रसिकांनी शिट्ट्या, टाळ्या आणि वन्समोअरने दाद दिली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विशाल शिंगाडे यांनी तर सूत्रसंचालन सतीश ओव्हाळ यांनी केले.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अर्चना टिळक, सुगत सोनवणे,सागर चव्हाण उपाध्यक्ष (उपक्रम),शरणम शिंगाडे
सल्लागार राजेंद्र अत्रे, डॉ. अभय शहापूरकर,
सदस्य धनंजय कुलकर्णी, दयानंद साबळे, सुरेश देवकुळे, प्रमोद जोगदंड, श्रीकांत साठे, अर्जुन धावारे, विशाल टोले, भैरू कदम,प्रसेनजित शिंगाडे, ताहेर शेख, दिग्विजय शिंगाडे, शुभम खोत, विजय उंबरे, सुमित शिंगाडे, विश्वनाथ काळे, सुमेध चिलवंत, ऋषीकेश गवळी, यशवंत शिंगाडे, संकेत नागणे, अक्षय दिवटे, सौरभ शिंगाडे, प्रविण सोनवणे, प्रसाद वाघमारे, प्रज्ञावंत ओहाळ, प्रशांत कांबळे, सारिपुत शिंगाडे यांनी कार्यक्रम यशस्वितेसाठी परिश्रम घेतले.