श्री सिध्दीविनायक परिवाराचा अभिनव उपक्रम

Spread the love

धाराशिव  : श्री सिध्दीविनायक मल्टीस्टेट को.ऑप. क्रेडीट सोसायटी लि. धाराशिव संस्थेच्या दैनंदिन आर्थिक माहितीच्या माहिती फलक उदघाटन मा. आ. श्री. सुजितसिंह ठाकुर सो. यांच्या हस्ते संपन्न. धाराशिव:- दिनांक १४/०८/२०२४ रोजी धाराशिव येथील श्री सिध्दीविनायक मल्टीस्टेट सोसायटीच्या मुख्य शाखा येथे संस्थेच्या दैनंदिन आर्थिक ताळेबंद दर्शवनारी माहिती फलक चे उदघाटन मा.आ.श्री.सुजितसिंह ठाकुर साहेब यांच्या शुभहस्ते व सहाय्यक निबंधक सहकारी संस्था मा.श्री.धनाजी काळे, तसेच सहकार अधिकारी श्री.बालाजी सावतर, सहकार बोर्ड श्री.मधुकर जाधव साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झाले. श्री सिध्दीविनायक मल्टीस्टेट मागील दशकांपासून धाराशिवकरांच्या विश्वासास पात्र ठरलेली संस्था असून २६००० पेक्षा जास्त खातेदारांनी या संस्थेच्या माध्यमातून आपले समाधानी आर्थिक व्यवहार केलेले आहेत. संस्थेने आपल्या सर्व सभासद, खातेदार, ठेवीदार यांना आपली दैनंदिन आर्थिक स्थिती माहिती करून देण्यासाठी एक अभिनव उपक्रमाद्वारे दैनंदिन आर्थिक माहितीचा फलक संस्थेच्या मुख्य कार्यालयाच्या बाहेर लाऊन एक आदर्श पारदर्शक व्यवहाराचा पायंडा निर्माण केला आहे. असे मा.श्री. सुजितसिंह ठाकुर साहेब यावेळी म्हणाले. श्री सिध्दीविनायक पारिवारची समाजातील विश्वासाहर्ता पारदर्शकता व नाविन्यपूर्ण उपक्रम या संपूर्ण परिवारासाठीच्या महत्वाच्या बाबी आहेत असे मा. श्री. धनाजी काळे यावेळी म्हणाले. या कौतुकास्पद उपक्रमाचे स्वागत संस्थेच्या सर्व ठेवीदार सभासदांच्या माध्यमातून होत आहे. यावेळी संस्थेचे संस्थापक श्री.दत्ताभाऊ कुलकर्णी, श्री. राजेश जाधव, श्री. प्रतिक देवळे, श्री. दिनेश कुलकर्णी, श्री. गणेश कामटे, अॅड. नितीन भोसले, श्री. अरविंद गोरे, श्री. जाहीर चौधरी, श्री. किशोर तिवारी, श्री. देविदास कुलकर्णी, श्री. नितीन हुंबे, श्री. लक्ष्मण शिंदे, श्री. प्रशांत वाघमारे, श्री. योगेश कुलकर्णी, श्री. रणजित भोरे, श्री.नितीन भोसले, व सर्व कर्मचारी उपस्थित होते.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!