धाराशिव दि.08 ) मुख्यमंत्री अन्नपुर्णा योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना वार्षिक 3 गॅस सिलेंडरचे पुनर्भरण (Refill) मोफत देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.या योजनेसाठी केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचे लाभार्थी तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे (एका कुटुंबात रेशन कार्डनुसार केवळ एक लाभार्थी) लाभार्थी या योजनेच्या लाभासाठी पात्र ठरतील.
हा लाभ केवळ 14.2 कि.ग्रॅ.वजनाच्या गॅस सिलेंडरची जोडणी असलेल्या गॅसधारकांना देण्याचे निर्देश आहे.या योजनेच्या पात्र लाभार्थ्यांची ई-केवायसी असणे गरजेचे आहे.आपले संलग्न असलेल्या गॅस एजन्सीकडे जाऊन तात्काळ ई-केवायसी करून घ्यावी.असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी स्वाती शेंडे यांनी केले आहे.