जिल्ह्यातील कार्याचा अहवाल सादर, विविध विकासकामांबाबत केली चर्चा
धाराशिव-कळंब विधानसभा मतदारसंघात पुन्हा भगवा फडकविण्या साठी जोमाने कामाला लागण्याचे दिले आदेश
शिवसेनेचे धाराशिव जिल्हाप्रमुख सुरज साळुंके यांनी दिल्ली येथे खा.डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन धाराशिव-कळंब विधानसभा मतदारसंघातील विविध विकासकामांबाबत चर्चा केली. तसेच जिल्ह्यातील कार्याचा अहवाल यावेळी त्यांनी सादर केला. धाराशिव-कळंब विधानसभेवर पुन्हा भगवा फडकवायचा आहे, ताकदीने कामाला लागा, असा कानमंत्र खा.डॉ.शिंदे यांनी जिल्हाप्रमुख सुरज साळुंके यांना यावेळी दिला.
धर्मवीर आनंद दिघे यांच्या आशीर्वादाने आणि मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली धाराशिव जिल्ह्यात शिवसेना पक्षाचे संघटन अधिक मजबूत करण्याचे काम जिल्हाप्रमुख सुरज साळुंके यांनी हाती घेतले आहे. धाराशिव शहरासह जिल्ह्यातील विविध प्रलंबित विकासकामांबाबत सतत पाठपुरावा करुन त्यांनी पालकमंत्री प्रा.डॉ.तानाजीराव सावंत, उमरगा-लोहारा मतदारसंघाचे आमदार ज्ञानराज चौगुले व महायुती घटक पक्षातील लोकप्रतिनिधी व पदाधिकार्यांच्या सहकार्यातून भरघोस निधी उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न केला. त्यांच्या या प्रयत्नांना मोठे यश मिळाले असून धाराशिव नगर परिषद अंतर्गत भुयारी गटार योजनेसाठी आणि रस्त्यांच्या कामाला नुकताच 150 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.
या कामाला लवकरच सुरुवात होणार आहे. त्याचबरोबर धाराशिव जिल्ह्यातील वर्ग-1 जमिनी कायम ठेवण्यात बाबत देखील चर्चा करण्यात आली.
धाराशिव आणि कळंब ग्रामीण साठी 2515, 9505, 8505 या योजने अंतर्गत अंतर्गत मिळालेला निधी, धाराशिव येथील नवीन बसस्थानक बांधकाम, कळंब नगरपरिषद पाणीपुरवठा साठी 70 कोटी रुपये निधी, धाराशिव येथे नवीन 500 बेड जिल्हा रुग्णालयाचे बांधकाम, वैद्यकीय क्षेत्रातील काम व इतर विविध विकासकामांबाबत यावेळी चर्चा करण्यात आली. त्यानंतर पक्षाचे जिल्हाप्रमुख या नात्याने जिल्ह्यात केलेल्या विविध कार्याचा अहवाल त्यांनी खा.डॉ.शिंदे यांच्याकडे सुपुर्द केला.
या कार्यअहवालाचे वाचन करुन त्यांनी समाधान व्यक्त करीत आणखी नव्या जोमाने कामाला लागण्याबाबत त्यांनी सूचना दिल्या. यावेळी शिवसेना प्रवक्ते योगेश केदार उपस्थित होते