धाराशिव जिल्ह्यात वाढत्या चोरीच्या घटनामुळे कायदा व सुव्यवस्था धोक्यात आली असून त्या घटना रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबविण्यासाठी पोलीस अधीक्षक कार्यालयात बैठक घेतली , या बैठकीत होमगार्ड बांधवांच्या विविध समस्यां जाणून घेतल्या व त्या सोडविण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ सूचना केल्या आहेत अशी प्रतिक्रिया आमदार कैलास घाडगे-पाटील यांनी दिली आहे.
धाराशिव जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून दरोडे, चोरी, लूटमारीच्या घटनात वाढ झाली आहे.. यामुळे नागरिक दहशतीखाली वावरत आहेत.. पोलिसांना या घटनांचा अद्याप उलगडा करता आलेला नाही.. एकंदर कायदा आणि सुव्यवस्थेचा बोजवारा उडालाय. पोलीस यंत्रणेकडून केल्या जाणाऱ्या उपाययोजना तोकड्या पडत असल्याचे वास्तव आहे.. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देण्यासाठी रात्रीची पेट्रोलिंग वाढवावी, रात्र गस्त पथक तैनात करावे, नाकाबंदी सुरू कराव्यात, ग्राम सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित कराव्यात अशा सूचना आ.पाटील यांनी केल्या.
यावेळी पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधिक्षक गौहर हसन, धाराशिव शहर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहरप्रमुख सोमनाथ गुरव उपस्थित होते.