धाराशिव जिल्ह्यात चार ठिकाणी चोरी, गुन्हे दाखल करण्यात आले आहेत अशी माहिती पोलिस प्रशासन कडुन देण्यात आले आहे.
धाराशिव ग्रामीण पोलीस ठाणे: फिर्यादी नामे- इकबाल मलीक आत्तार, वय 58 वर्षे, रा.पिंपरी ता. जि. धाराशिव यांचे शेत गट नं 159 पिंपरी शिवारातील शेतातील एकुण लहान मोठ्या 17 शेळ्या अंदाजे 68,000₹ किंमतीच्या दि. 27.07.2024 रोजी 10.30 ते 11.00 वा. सु. अनोळखी तीन इसमांनी चोरुन नेल्या. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- इकबाल आत्तार यांनी दि.03.08.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन धाराशिव ग्रामीण पो ठाणे येथे भा.न्या.सं. 303(2) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
आनंदनगर पोलीस ठाणे: फिर्यादी नामे- पल्लवी अजय शिंदे, वय 20 वर्षे, रा.गोरोबा काका नगर सांजा ता. जि. धाराशिव यांची अंदाजे 50,000₹ किंमतीची हिरो होंडा कंपनीची मॅट अबरॉक्स ऑरेंज रंगाची मोटरसायकल क्र एमएच 25 बीसी 0534 ही दि. 01.06.2024 रोजी 22.30 ते 02.06.2024 रोजी 04.00 ते 05.00 वा. सु.गोरोबा काका नगर सांजा येथुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- पल्लवी शिंदे यांनी दि.03.08.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन आनंदनगर पो ठाणे येथे भा.न्या.सं. 303(2) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
वाशी पोलीस ठाणे: दि.01.08.2024 रोजी सांयकाळी 7.00 ते दि. 02.08.2024 रोजी सकाळी 07.00 वा. सु. भुंजंग स्वयंरोजगार सेवा उधोग सह संस्था मर्या धाराशिव या ऐजन्सीचे सोनारवाडी फिडर ते मांडवा असे 11 के व्हि.लिंक लाईनचे ॲल्युमिनियमचे तार ओढण्याचे काम चालू असताना आरोपी नामे- माणिक गुलाब काळे, रा. कासारखाणी पारधी पिढी व सोबत तीन इसम यांनी 5,500मिटर ॲल्युमिनीयमची तार अंदाजे 90,000₹ किंमतीची चोरुन नेली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- प्रताप प्रविण मते, वय 27 वर्षे, व्यावसाय खाजगी नोकरी रा.दहीफळ ता. कळंब जि. धाराशिव यांनी दि.03.08.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन वाशी पो ठाणे येथे भा.न्या.सं. 303(2), 3(5) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
धाराशिव शहर पोलीस ठाणे: फिर्यादी नामे- श्रध्दा दत्ता मळाळे, वय 30 वर्षे, रा. बौध्द नगर पाठीमागे भिमनगर धाराशिव ता. जि. धाराशिव यांची अंदाजे 30,000₹ किंमतीची निळ्या रंगाची टि व्ही एस ज्युपीटर कंपनीची स्कुटी क्र एमएच 25 ए.टी 4941 ही दि. 30.07.2024 रोजी रात्री 11.00 ते 31.06.2024 रोजी 08.00 वा. सु. बौध्द विहार भिमनगर धाराशिव येथुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- श्रध्दा मळाळे यांनी दि.03.08.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन धाराशिव शहर पो ठाणे येथे भा.न्या.सं. 303(2) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.