सुधीर पाटील यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये प्रवेश , धाराशिव-कळंब विधानसभेसाठी इच्छुक! , निवडणुकीच्या तोंडावर प्रवेश झाल्याने चर्चेला उधाण!
धाराशिव : भाजपमधुन शिवसेनेमध्ये सुधीर पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेना पक्षामध्ये प्रवेश केला आहे. 2024 लोकसभेसाठी देखील ते इच्छुक होते तर विधानसभेसाठी देखील ते इच्छुक आहेत व निवडणुकीच्या ऐन तोंडावर त्यांनी भाजपमधून शिवसेनेमध्ये प्रवेश घेतल्यामुळे उमेदवारी मिळण्याची शक्यता देखील जास्त आहे. असा अंदाज वर्तविला जात आहे . व निवडणुकीच्या तोंडावर प्रवेश झाल्याने सुधीर पाटील यांनाच धाराशिव-कळंब विधानसभेचे उमेदवारी मिळेल अशा चर्चेला उधान आले आहे. सुधीर पाटील यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केल्यानंतर जुन्या स्वगृही परततोय, पुन्हा एकदा जात गोत्र आणि धर्म आमुचा शिवसेना! अशी एका वाक्यात प्रतिक्रिया दिली आहे.
सुधीर पाटील यांनी लिहिलेली पोस्ट खालील प्रमाणे आहे..
जुन्या घरी, स्वगृही परततोय, पुन्हा एकदा जात-गोत्र अन् धर्म आमुचा शिवसेना !
वंदनीय शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आपल्या रक्तात आहेत, लहानपणापासूनच बाळासाहेबांच्या विचारांचा झंझावत धारशिव जिल्ह्यात आपण सर्वांनीच पाहिलाय. त्यामुळेच, माझ्या सामाजिक व राजकीय आयुष्याची सुरुवातच शिवसैनिक म्हणून झाली. मात्र, मधल्या काळात काही राजकीय स्थित्यंतर बदलत गेली अन् मूळ शिवसेनेपासून मी काहीसा दूर गेलो. आज पुन्हा एकदा आपल्या स्वगृही परततोय, आपल्या शिवसेनेत येतोय, बाळसाहेबांच्या विचारांचा वारसा पुढे घेऊन जाणाऱ्या शिवसेनेत घरवापसी करतोय.
राज्याचे मुख्यमंत्री व बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार एकनाथजी शिंदे साहेबांच्या उपस्थितीत आज शिवसेनेत प्रवेश केला.
शिवसैनिक म्हणून धाराशिव जिल्ह्यात मी राजकीय कार्याला सुरुवात केली. त्यानंतर, माझ्या कामाची पद्धत आणि शिवसैनिकांमधला गुण रक्तातच असल्याने शिवसेनेत मला उपजिल्हाप्रमुख म्हणून 3 वर्षे काम करण्याची संधी मिळाली. तर 6 वर्षे धाराशिव जिल्हाप्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. या काळात शेतकरी, व सर्वसामान्यांसाठी अनेक आंदोलने केली. शिवसेनेच्या शाखा गावखेड्यात वाढविण्यासाठी कसोशीने प्रयत्न केले. त्यामुळे, आज पुन्हा शिवसेनेत परत येत असताना आपल्या जुन्या घरी आल्याची जाणीव होतेय.
स्व. बाळासाहेबांच्या आशीर्वादाने शिवसेनेत सन 1988 साली मी पक्षप्रवेश केला व 1989 साली धाराशिवमधून विधानसभा निवडणूक लढवली होती, त्यानंतर 2014 मध्ये तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली आहे. त्यामुळे, शिवसेनेसोबत जोडलेलं नातं, आणि शिवसैनिक म्हणून असलेला बाणा हा कधीही सुटणार नाही. म्हणूनच, आज पुन्हा शिवधनुष्य हाती घेत आहे, धाराशिव जिल्ह्याच्या विकासासाठी, आपल्या लोकांसाठी पुन्हा एकदा…
जात-गोत्र अन् धर्म आमुचा शिवसेना, शिवसेना, शिवसेना.
आपल्या सर्वांच्या शुभेच्छा आणि सोबतीची सदैव गरज असेल.
जय महाराष्ट्र !!