मुंबई : १० जुन २०२२ ला राज्यसभा तर २० जुन २०२२ ला विधानपरिषदेच्या निवडणूकीत फडणवीसांनी आपला मॅजिक पॅटर्नन दिला होता महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला होता. २०२२ च्या निवडणूकींचे मुख्य सुत्रधार देवेंद्र फडणवीस यांच्यामुळच महाविकास आघाडी सरकार कोसळलं होत. यामुळे यंदाही या मतदानाच्या मॅजिक पॅटर्नची संपुर्ण जबाबदारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच देण्यात आली होती. २०२२ च्या धक्कादायक निकालांचा मॅजिक पॅटर्न पुन्हा एकदा खरा करून दाखवला आहे. २०२२ ला राज्यसभा आणि विधानपरिषदेत विजयानंतर आज फडणवीसांची विजयी हॅट्रिक झाली आहे.
विधानपरिषेदेच्या गणितांमध्ये फडणवीसांची बेरीज सर्वांवरच भारी आहे. सलग ५ टर्म आमदार असणार्या शरद पवार पुरस्कृत उमेदवाराला फडणवीसांकडून धोबीपछाड करत पराभव करण्यात आला आहे. तसेच येणाऱ्या निवडणुकीमध्ये देखील फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रामध्ये विजय मिळेल अशी आशा महायुतीतील नेते मंडळी व्यक्त करताना दिसत आहेत.