धाराशिव/ प्रतिनिधी
मराठा आरक्षण संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील मराठा समाज जनजागृती व शांतता रॅली साठी बुधवार दिनांक10 जुलै रोजी धाराशिव येथे येत आहेत. त्यांच्या कार्यक्रमाच्या नियोजनसाठी तयारी पूर्ण झाली आहे.
जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण जनजागृती व शांतता रॅलीला सुरुवात राजमाता अहिल्याबाई होळकर चौकातून अण्णाभाऊ साठे चौक, श्री धारासुर मर्दिनी , खाजा शमशुद्दीन दर्गा ,विजय चौक नेहरू चौक काळा मारुती चौक संत गाडगेबाबा चौक येथून महिला भगिनी या रॅलीत सहभागी होऊन,भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथून छत्रपती शिवाजी महाराज चौकात मराठा आरक्षण जनजागृती व शांतता रॅली आल्यानंतर मनोज जरांगे पाटील शांतता रॅलीला मार्गदर्शन करतील
रॅलीचे वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक महापुरुषाच्या चौकात त्या त्या समाजाचे बांधव जरांगे पाटलांचे स्वागत करणार आहेत.
मराठा आरक्षण जनजागृती व शांतता रॅली अभूतपूर्व व अविस्मरणीय होण्यासाठी जिल्ह्यातील मराठा बांधव तन-मन-धनाने कामाला लागलेले आहेत .
बैठक आयोजित करून पूर्णपणे कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आलेले आहे. उमरगा लोहारा तुळजापूर धाराशिव कळंब वाशी भूम परंडा बार्शी तसेच आजूबाजूच्या जिल्ह्यावरूनही समाजबांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित राहणार आहेत
. महिला व पुरुष स्वयंसेवकाची टीम तयार करण्यात आलेली आहे. त्यासाठी टी-शर्ट आयडेंटी कार्ड, व विशेष कोड ही देण्यात आलेली आहेत
रॅलीतील समाज बांधवांची गैरसोय होऊ नये यासाठी जागोजागी चहा,नाष्ट्याची,पाण्याची,ॲम्बुलन्सची व्यवस्था करण्यात आली आहे.
रॅलीत पारंपारिक वाद्य भजनी मंडळी, आराधी मंडळी लेझीम पथक, ढोल पथक हलगी पथक ,सहभागी होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
धाराशिव शहरात प्रत्येक चौक, गल्ली, वार्डातील समाज बांधवांची बैठक आयोजित करून जनजागृती करण्यात आली आहे तसेच कळंब ,भुम, परंडा, वाशी तुळजापूर उमरगा लोहारा, बार्शी या तालुक्यातील ही कार्यकर्ते गावोगावी जाऊन समाज बांधवांना शांतता रॅलीत सहभागी होण्यासाठी गावोगावी जनजागृती करण्याचे काम केलेले आहे.
मनोज जरांगे पाटील यांची मराठा आरक्षण शांतता रॅलीच्या नियोजनासाठी कार्यकर्ते जनजागृतीसाठी वाहनावर बॅनर लावणे, ध्वज लावणे चौकाचौकात जनजागृती बॅनर ,वाहन रॅली , नियोजन बैठका घेत संपूर्ण जिल्हा पिंजून काढला आहे.