Dharashiv : दिनांक 26 मे 2024 रोजी धाराशिव तालुक्यासह बेंबळी परिसरात अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. बेंबळीसह परिसरातील अनेक गावांमध्ये या अवकाळी पावसाचा फटका शेतकरी, मजुर व व्यापारी यांना बसलेला असुन या अवकाळी पावसामुळे अनेक नागरीकांच्या राहत्या घरावरील पत्रे, जनावरांसाठी केलेले पत्र्याचे शेड उडून गेले असून झाडे पडून घरांचे मोठया नुकसान झाले आहे. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी बेंबळी परिसरातील नुकसानीची पाहणी करून प्रशासनास तात्काळ पंचनामे करुन शासनास सादर करण्याच्या सुचना दिल्या यावेळी महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व नुकसानग्रस्त नागरीक, शेतकरी, व्यापारी मोठया प्रमाणात उपस्थित होते.