उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील 31 उमेदवारांचे भाग्य ईव्हीएममध्ये बंद
निवडणुकीत 60 टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज
धाराशिव दि. 07 (माध्यम कक्ष) उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज 7 मे रोजी 60 टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.या निवडणुकीत उभ्या असलेल्या 31 उमेदवारांचे भाग्य ईव्हीएममध्ये बंद झाले.आज झालेल्या मतदानाची मतमोजणी 4 जून रोजी शासकीय तंत्रनिकेतन धाराशिव येथे होणार आहे.
मतदानाची वेळ सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत होती.कडक ऊन लक्षात घेता काही मतदारांनी सकाळी तर काही मतदारांनी सायंकाळी पाच वाजतानंतर मतदान करण्याची वेळ निवडली.त्यामुळे सायंकाळी 6 वाजतानंतर देखील काही मतदान केंद्रावर मतदान सुरू होते.वोटर टर्न आउट अँपवरील माहितीनुसार 60.41 टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.औसा – 61.65 टक्के,बार्शी – 64.95 टक्के,उमरगा -64.76 टक्के, उस्मानाबाद – 60.21 टक्के,परंडा – 59.35 टक्के आणि तुळजापूर -61.32 टक्के असे मतदान झाले.मतदानाची टक्केवारी 60.41 इतकी आहे.