धाराशिव तालुक्यातील आळणी, वडगाव सि.,उतमी कायापुर याठिकाणी महाविकास आघाडीचे लोकप्रिय खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या प्रचारार्थ मा.श्री. आमदार कैलास दादा पाटील,धाराशिव शिवसेना सहसंपर्कप्रमुख शंकरराव तात्या बोरकर,यांची सभा पार पडली.
यावेळी आमदार कैलास दादा पाटील यांनी भाषणात सांगितले की महागाईवर काही बोलायचे नाही.शेतकरी प्रत्येक गोष्टीवर जी एस टी.भरतात आणि हे प्रचार करतात मोदींचे 6 हजार आले.खाद्य तेल सोयापेंड आयात केली.यातुन फायदा कुणाचा कोंबडयाचा मग यांनी मत कुणाला मागायची शेतकऱ्यांच्या मुळावरच हे सरकार आहे.
पाण्याची बाटली 20 रूपयाला शेतकऱ्यांच्या दुधाला 22 रूपये भाव महाराष्ट्राच राजकारण नासवणारा माणुस म्हणजे देवेंद्र फडणवीस आहे.जिल्हाचं विनाश करणारं हे पाटील कुटुंब यांना जिल्हयातुन हद्द पार करा.असे आवाहन कैलास पाटील यांनी केले.
यावेळी शिवसेना सहसंपर्कप्रमुख शंकरराव बोरकर यांनी सर्व ओ बी सी समाज बांधव यांना आवाहन केले.मोदी यांनी आपल्या देशाची कशी वाट लावली.तरूणाला कसं बेरोजगार केलं याचा पाढाच वाचला.महाराष्ट्र अदानी च्या घशात घालुन सर्व उद्योग गुजरातला घालवण्याचे पाप हे भाजप सरकारने केलं आहे.
याप्रसंगी शिवसेना उपजिल्हाप्रमुख विजयकुमार सस्ते,पं स सदस्य संग्राम देशमुख,विनोद वीर, रवि कोरे आळणीकर,विनोद लावंड,माजी सरपंच अंकुश मोरे,पं स.गजेंद्र जाधव, श्रीपाल वीर,युवा सेना धाराशिव तालुका प्रमुख वैभव वीर, राजाभाऊ किरदत्त,अनंत खोबरे,अनंत वीर,राज दादा वीर, विश्वजीत वीर, शामसुंदर लावंड,सचिन देशमुख,अजित वीर, आण्णासाहेब कदम, यांच्यासह शिवसैनिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.