धाराशिव लोकसभेतील उमेदवारांच्या प्रचाराने आता वेग घेतला आहे. कोपरासभा,गाव भेट दौऱ्याबरोबरच अन्य मार्गांनी मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी नेते प्रयत्नशील असल्याचे दिसते. महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांच्या प्रचारार्थ आमदार राणाजगजितसिंह यांनी आठवडे बाजारात नागरिकांशी संवाद साधला. केंद्रात पुन्हा एकदा मोदी सरकार येणार आहे. मतदारसंघात विकास कामासाठी निधीचा ओघ आणायचा असले तर, आपल्या हक्काचा खासदार निवडून द्या. मग आपल्याला कोणी रोखू शकणार नाही, असे आवाहन करत पाटील यांनी मतदारांना विकासाची गॅरंटी दिली.
धाराशिव लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांच्या प्रचारासाठी राणाजगजितसिंह पाटील यांनी औसा तालुक्यातील उजनी येथे आठवडी बाजारात पदयात्रा काढत व्यापारी, शेतकरी, महिला व ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधला. केंद्रात पुन्हा एकदा मोदी सरकार येणार आहे. निधीचा ओघ आपल्याकडे वळविण्यासाठी निवडून येणारा खासदार हा आपल्या हक्काचा असणे गरजेचे आहे. तेव्हाच आपल्या भागाचा सर्वांगीण विकास होऊ शकतो. तेव्हा येत्या निवडणुकांमध्ये महायुतीला प्रचंड मताधिक्याने विजयी करा, असे आवाहन पाटील यांनी केले.
दरम्यान, पदयात्रेपुर्वी त्यांनी बाणगंगा साखर कारखाना येथे भेट देऊन कर्मचारी व गावकऱ्यांशी संवाद साधला. केंद्रात पुन्हा मोदी सरकार येणार असून आपल्या लोकसभा क्षेत्रात त्याच विचारांचा खासदार असल्यास विकासापासून कोणीही रोखू शकणार नाही, असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले.