धाराशिव ता.30- खासदार ओमराजे यांनी पाच वर्ष काम केले असुन त्याना जनता कामाच्या जोरावर निवडुन देईल असा विश्वास माजीमंत्री दिलीपराव देशमुख यानी व्यक्त केला. ते किल्लारी (ता.औसा) येथील प्रचारसभेत ते बोलत होते.
यावेळी श्री.देशमुख म्हणाले की, शिवसेनेमुळे भाजप राज्यात वाढली मोठी झाली. जेव्हा देशात त्यांचे बळ वाढले तस पहिला वार भाजपन याच शिवसेनेवर केला. भाजपची ही जुनी पध्दत असुन ज्याच्या बोटाला धरुन पक्ष उभा राहतो, ज्या शिढीवरुन ते वर चढतात पहिलाच वार त्याच लोकावर करतात हे आपल्याला शिवसेनेवर केलेल्या दगाबाजामुळे दिसुन आल्याचे श्री. देशमुख यानी सांगितले. फोडाफोडीच्या राजकारणात काही मोजके लोकप्रतिनिधी शिवसेनेत शिल्लक राहिले जे विकले गेले नाहीत त्यामध्ये आपले खासदार आहेत. खासदार ओमराजे यांनी गेल्या पाच वर्षात केलेल्या कामाच्या जीवावर ते उभा आहेत. ते घराणेशाहीने लादले गेलेले नाहीत. त्यामुळे कामाच्या जोरावर ओमराजे चांगल्या मताधिक्याने विजयी होतील असा विश्वास त्यानी व्यक्त केला. देशात इंडीया आघाडीचे सरकार येणार आहे, त्या सरकारमध्ये शिवसेनेच्या कोट्यातुन ओमराजे देशाच्या मंत्रीमंडळात असावे यासाठी देशमुख कुटुंब प्रयत्न करणार असल्याचे श्री.देशमुख यानी सांगितले.
श्री.देशमुख म्हणाले की, मोदी सरकार मुठभर उद्यगपतीना जगविण्याचे काम करत आहे, तर दुसरीकडे शेतकऱ्यांच्या मालाचे दर पाडण्याचे पाप देखील त्यानी केले आहे. सरकारचे दलाल या सगळ्या गोष्टी करुन बाहेरच्या देशातील माल आयात करण्यात येत असुन त्यामुळे देशातील शेतकऱ्यांचा माल कवडीमोल किंमतीमध्ये विकला जात आहे. या सरकारला आता शेतकऱ्यांनीही त्यांची शक्ती दाखवुन देत त्याना घरी बसविले पाहिजे असे अवाहन श्री. देशमुख यानी केले.
आज किल्लारी ता.औसा येथे उस्मानाबाद (धाराशिव) लोकसभा मतदार संघाची महाविकास आघाडीची प्रचार सभा मा.श्री दिलीपरावजी देशमुख साहेब (मा. मंत्री महाराष्ट्र राज्य), मा.श्री दिनकर माने साहेब ( मा. आ. तथा जिल्हाप्रमुख) यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली.
यावेळी श्रीशैल्य उटगे (काँग्रेस जिल्हाध्यक्ष), भरत (भाऊ) सुर्यवंशी ( जिल्हा अध्यक्ष रा. युवक कॉग्रेस), मा. संतोष सोमवंशी (सहसंपर्कप्रमुख) , मा. जयश्री ताई उटगे, मा. राजेंद्र मोरे (शेतकरी संघटक लातूर/ धाराशिव संपर्क प्रमुख), प्रज्ञा पाटील (मा. जि. प. सदस्य),मा. नारायण आबा लोखंडे (मा. जि. प. उपाध्यक्ष लातूर) मा. बजरंग दादा जाधव (उपजिल्हप्रमुख), मा. संतोष सुर्यवंशी, मा. दिनेश जावळे (जिल्हाप्रमुख), सौ. रेखा ताई पुजारी, मा. रामदास चव्हाण (मा.जि. प. सदस्य) मा. पुजा ताई सगर, मा. सुनिता भोसले, श्रीपतराव काकडे साहेब, मा. यत्तलेश्वर बावगे, सौ. बाबळसुरे (ताई) (सरपंच किल्लारी), मा. सचिन पाटील ( चेअरमन मारुती महाराज), मा. सुभाष (दाजी) पवार, मा. दत्तोपंत सुर्यवंशी (तालुका अध्यक्ष कॉग्रेस) मा. आबासाहेब पवार (तालुका प्रमुख) , मा. शामराव पाटील (तालुका अध्यक्ष कॉग्रेस) उपस्थित होते.