धाराशिव ता.24- उस्मानाबाद (धाराशिव) लोकसभेचे दोनवेळा खासदार राहिलेले शिवाजी बापु कांबळे यांनी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून पुन्हा स्वृगही परतले आहेत. मागील काळात त्यानी भाजपमध्ये प्रवेश केला होता मात्र भाजपच्या कार्यप्रणाली कंटाळुन त्यानी उध्दव ठाकरे यांच्याकडे येण्याचा निर्णय घेतला.
नांदेड येथे जिल्हाप्रमुख तथा आमदार कैलास पाटील यांच्या पुढाकाराने शिवाजी बापु कांबळे यानी पक्षप्रमुखाच्या हस्ते पक्षात प्रवेश केला आहे. ते 1996 च्या निवडणुकीत धाराशिवमध्ये पहिल्यांदा शिवसेनेचा खासदार म्हणुन निवडुन आले होते. त्यानंतर 1998 ला ते पुन्हा खासदार राहिले होते. पक्षाच्या अत्यंत संघर्षाच्या काळात ते पुन्हा एकदा त्याच उमेदीने कामाला लागले आहेत.