धाराशिव दि 18 (अंतरसंवाद न्यूज ): भारत निवडणूक आयोगाने 40 – उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघासाठी निवडणूक निरीक्षक (सामान्य) म्हणून भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी श्री.प्रमोदकुमार उपाध्याय यांची नियुक्ती केली आहे.श्री उपाध्याय हे आज 18 एप्रिल रोजी रात्री जिल्ह्यात दाखल होत आहे.
उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघासाठी 7 मे रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदान होणार आहे.12 एप्रिलपासून नामनिर्देशनपत्र दाखल करण्यास सुरुवात झाली आहे.19 एप्रिलपर्यंत नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची शेवटची तारीख आहे.20 एप्रिल रोजी नामनिर्देशन पत्राची छाननी करण्यात येणार असून 22 एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्यात अंतिम दिनांक आहे.
लोकसभेची ही निवडणूक खुल्या व निष्पक्ष वातावरणात घेण्याचे दृष्टीने भारत निवडणूक आयोगाने निवडणूक निरीक्षक (सामान्य) म्हणून प्रमोदकुमार उपाध्याय यांची नियुक्ती केली आहे.श्री.उपाध्याय यांचे कार्यालय शासकीय विश्रामगृह शिंगोली येथे सुरू करण्यात आले असून त्यांचा मुक्काम विश्रामगृहातील वेरूळ सूट येथे राहणार आहे.
निवडणूकविषयक कोणतीही तक्रार किंवा सूचना असल्यास वरील पत्त्यावर पाठविण्यात याव्या.त्यांच्या कार्यालयाचा दूरध्वनी क्रमांक 02472-235470 असून त्यांच्या 7821856813 या भ्रमणध्वनी क्रमांकावर देखील संपर्क साधता येईल.